प्रियंकाच्या डिपनेक गाऊनवर आई मधू चोप्रा म्हणाली, 'तिचे शरीर आहे, तिला जे करायचे ते ती करेल'

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने नुकत्याच पार पडलेल्या गॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये पती निक जोनासोबत हजेरी लावली होती. यावेळी प्रियंकाने डिपनेक गाऊन घातला होता. तिचा हा बोल्ड अवतार पाहून नेटीझन्सनी तिला ट्रोल केलं. परंतु, या सर्व प्रकारानंतर आई मधू चोप्राने प्रियंकाची पाठराखण करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Priyanka Chopra, Madhu Chopra (PC - Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) नुकत्याच पार पडलेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये (Grammy Awards Ceremony) पती निक जोनासोबत हजेरी लावली होती. यावेळी प्रियंकाने डिपनेक गाऊन घातला होता. तिचा हा बोल्ड अवतार पाहून नेटीझन्सनी तिला ट्रोल केलं. परंतु, या सर्व प्रकारानंतर आई मधू चोप्राने प्रियंकाची पाठराखण करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

मधु चोप्रा टीकाकारांना उत्तर देताना म्हणाल्या, मी खूप खुश आहे. कारण यामुळे प्रियांका आणखी जास्त कणखर झाली. ती कोणाचेही नुकसान करत नाही. तिचे शरीर आहे, तिला जे करायचे असेल ते ती करेल. तिच्याकडे सुंदर शरीर आहे. प्रियंकाला ट्रोल करणारे सर्व पडद्यामागे बसणारी लोक आहे. त्यांच्या स्वत:च्या आयुष्यात करण्यासारखे काहीही नाही. अशा ट्रोलर्स मी किंवा प्रियंका दोघेही किंमत देत नाही,’ अशा शब्दांत मधू चोप्रा यांनी ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे. (हेही वाचा - बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणार संजय दत्त? दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी ट्विट मधून दिली हिंट)

 

View this post on Instagram

 

#priyankachopra mom #madhuchopra on the Grammy outfit which was the most discussed on social.media especially on the @priyankachopra handle as it received over 34 thousand plus comments #ViralBhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

View this post on Instagram

 

Tassel fun. #grammys

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

मधू चोप्रा यांच्यानंतर प्रियंकानेही ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. 'मला कम्फर्टेबल वाटतात, अशाच पद्धतीने माझे कपडे तयार होतात. ग्रॅमी अवार्डमधील माझा ड्रेस माझ्यासाठी कम्फर्टेबल होता. कोणत्याही पुरस्कार सोहळ्यामध्ये मी माझ्या कपड्यांमुळे किंवा फॅशनमुळे अडचणीत येणार नाही याची काळजी घेत असते. टीका करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही, असंही ठाम मतही प्रियंकाने यावेळी व्यक्त केलं आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now