Happy Holi 2021: प्रियंका चोप्राने पती निक जोनस आणि कुटूंबासह साजरी केली होळी; पहा खास फोटोज
हा फोटो पोस्ट करताना निकने आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Happy Holi 2021: आज होळीचा सण देशभर साजरा होत आहे. तथापि, कोरोनाव्हायरसचा धोका लक्षात घेता, सर्वांना सुरक्षित पद्धतीने होळी खेळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) देखील पती निक जोनस (Nick Jonas) आणि तिच्या कुटुंबीयांसह होळी साजरी करताना दिसली आहे. निक जोनासने आपल्या सोशल मीडियावर प्रियंका चोप्रासोबत होळी साजरी करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करताना निकने आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या फोटोमध्ये निक आणि प्रियांकाची जोडी खूपचं सुंदर दिसत आहे. व्हाईट जॅकेटसह ब्लॅक शॉर्टमध्ये निक खूप स्मार्ट दिसत आहे, तर प्रियांका व्हाईट टी-शर्ट आणि ब्लॅक स्वेटपॅन्टमध्ये अप्रतिम दिसत आहे. या फोटोमध्ये प्रियांका तिच्या सासू-सासऱ्यांसोबतही दिसत आहे. (वाचा - Holi 2021: सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिज यांचा होळीतला भन्नाट डान्स पाहिलात का? व्हिडिओ पाहून होतील आठवणी ताज्या)
यासह प्रियंकाने लिहिलं आहे की, 'होळी, रंगांचा उत्सव माझ्या आवडीचा सण आहे. आशा आहे की, आपण सर्वजण आपल्या प्रियजनांसोबत घरातचं हा उत्सव साजरा करू.'
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रियंका चोप्राला शेवटी ‘द व्हाईट टायगर’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात प्रियंकाने राजकुमार रावसोबत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. याशिवाय प्रियांका हॉलिवूड चित्रपट मॅट्रिक्स 4 आणि काऊबॉय निन्जा वायकिंगमध्ये दिसणार आहे.