प्रभास आणि पूजा हेगडेचा 'Radhe Shyam' चित्रपट OTT वरही पाहता येणार; तब्बल 250 कोटींना झाली डील- Reports

त्याच्या चित्रपटाच्या कमाईने आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खानच्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. प्रभास सध्या दक्षिणेकडीलच नाही तर भारतामधील सर्वात महागडा अभिनेता बनला आहे

राधे शाम (संग्रहित संपादित प्रतिमा)

लवकरच ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) हे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. बाहुबली चित्रपटाने प्रभास भारतातील सर्वात मोठा सुपरस्टार बनला आहे. त्याच्या चित्रपटाच्या कमाईने आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खानच्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. प्रभास सध्या दक्षिणेकडीलच नाही तर भारतामधील सर्वात महागडा अभिनेता बनला आहे. आता प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट 11 मार्चला प्रदर्शित होत आहे आणि चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आता हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या डिजिटल डीलमुळे चर्चेत आला आहे. राधे श्यामचे सॅटेलाइट आणि डिजिटल हक्क एका स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला विकले गेल्याचे वृत्त आहे. अहवालानुसार हा सौदा अडीचशे कोटी रुपयांमध्ये झाला आहे. आधी बातमी आली होती की, एका OTT प्लॅटफॉर्मने राधे श्यामला थेट त्यांच्या OTT वर रिलीज करण्यासाठी 400 कोटी रुपयांची ऑफर दिली होती.

राधे श्यामचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. हा चित्रपट युरोपमध्ये चित्रित करण्यात आला आहे. तो 1970 च्या दशकातील कथा मांडतो. राधे श्याममध्ये प्रभास विक्रमादित्यच्या भूमिकेत आहे, तर पूजा हेगडे ​​प्रेरणाची भूमिका सकारात आहे. या चित्रपट जानेवारीत रिलीज होणार होता, मात्र कोरोना विषाणूमुळे राधेश्यामची रिलीज पुढे ढकलण्यात आली. राधे श्यामची निर्मिती सुपरस्टार प्रभास, गोपी कृष्णा मुव्हीज, युवी क्रिएशन्स आणि टी-सीरीज यांच्या संयुक्त विद्यमाने केली आहे. (हेही वाचा: Rohit Shetty Studio: रोहित शेट्टी स्वत:चा स्टुडिओ बनवणार, स्टुडिओ मुंबई किंवा गुजरातमध्ये बनवण्याची शक्यता)

दरम्यान, प्रभासने त्याच्या आधीच्या रिलीज झालेल्या 'साहो'मध्ये स्वतः हिंदीत डबिंग केले होते. 'राधे श्याम'मध्ये पुन्हा एकदा त्याचाच आवाज हिंदीतही ऐकायला मिळणार आहे. हे काम त्यांनी कोणत्याही डबिंग आर्टिस्टकडून करून घेतलेले नाही. चित्रपटात दोन भिन्न संगीत दिग्दर्शक आहेत कारण चित्रपट तेलगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होत आहे.