Anushka Sharma Birthday: अनुष्का शर्माच्या वाढदिवसानिमित्त विराट कोहलीने अभिनेत्रीचे Unseen फोटो शेअर करत दिल्या खास शुभेच्छा
विराट कोहलीच्या प्रेमळ संदेशाशिवाय इतर स्टार्सनीही अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत.
Anushka Sharma Birthday: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ने नेहमीच तिच्या चित्रपटांमधून लोकांचे मनोरंजन केले आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि लाखो चाहत्यांच्या हृदयाची धडकन अनुष्का शर्माचा आज 35 वा वाढदिवस आहे. अभिनेत्रीच्या या खास दिवसानिमित्त विराट कोहलीने तिला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 2017 मध्ये लग्न केले. 2019 मध्ये, या जोडप्याने एक सुंदर मुलगी वामिकाला जन्म दिला. आज या जोडप्याचे छोटे पण सुंदर कुटुंब आहे. डेटिंगपासून आतापर्यंत चाहत्यांनी या जोडप्याशी संबंधित प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला लाईक केले आहे आणि आजही विराट-अनुष्काच्या पोस्ट चाहते लाईक करतात तसेच त्यावर कमेंटही करतात. (हेही वाचा - Aryan Khan Clothing Brand: आर्यन खानने लाँच केला D'YAVOL कपड्यांचा ब्रँड; किंमत पाहून नेटीझन्स म्हणाले, 'किडनी विकावी लागेल')
विराट कोहलीने आपली पत्नी अनुष्का शर्माला तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले आहे की, "तुझ्या वेडेपणाबरोबरच, प्रत्येक क्षणी तुझ्यावर खूप सारे प्रेम. जे माझे सर्वस्व आहे त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."
विराटने अनुष्का शर्माचे समुद्रकिनाऱ्यावर काढलेल्या फोटोंसह अनेक फोटो शेअर केले आहेत. विराट कोहलीच्या प्रेमळ संदेशाशिवाय इतर स्टार्सनीही अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत. करीना कपूर खान, वाणी कपूर, रश्मिका मंदान्ना यांच्यासह अनेक चित्रपट कलाकारांनी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बर्थडे गर्ल अनुष्का शर्माच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री 'चकदा एक्सप्रेस'मध्ये क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट 16 डिसेंबर 2023 असल्याचे सांगण्यात येत आहे.