Ole Ole 2.0 Song in Jawaani Jaaneman: सैफ अली खान चे एकेकाळी लोकप्रिय झालेले गाणे एका नव्या अंदाजात घेऊन आलाय जवानी जानेमन या चित्रपटामधून, Watch Video
या चित्रपटाची जितकी उत्सुकता लोकांमध्ये आहे तितकीच उत्सुकता सैफचे एकेकाळी गाजलेले गाणे 'ओले ओले' या चित्रपटातून पुन्हा एकदा नवीन अंदाजात आपल्यासमोर येणार आहे.
तब्बल 20 वर्षानंतर एकत्र येणारी जोडी सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि तब्बू (Tabu) यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने जवानी जानेमन या चित्रपटाची वाट पाहात आहे. या चित्रपटाची जितकी उत्सुकता लोकांमध्ये आहे तितकीच उत्सुकता सैफचे एकेकाळी गाजलेले गाणे 'ओले ओले' या चित्रपटातून पुन्हा एकदा नवीन अंदाजात आपल्यासमोर येणार आहे. नुकतच हे गाणं प्रदर्शित झाले असून यात सैफचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात पूजा बेदी ची मुलगा आलिया फर्निचरवाला ही झळकणार आहे.
या गाण्यामध्ये सैफच्या जुन्या गाण्याप्रमाणे अनेक मुली आजूबाजूला थिरकताना दिसणार आहे. पाहा व्हिडिओ
हेदेखील वाचा- 'Jawani Janeman' चित्रपटामधून पूजा बेदीची मुलगी आलिया करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
हे गाणे अमित मिश्रा यांनी गायले असून तनिष्क बागची याचे संगीतकार आहेत. सन 1994 साली प्रदर्शित झालेला 'ये दिल्लगी' या चित्रपटात सैफ अली खान अनेक मुलींच्या गराड्यात 'ओले ओले' या गाण्यावर नाचताना दिसला. तेव्हा हे गाणे गायक अभिजीत याने गायले होते ज्यांना त्या वेळी या गाण्यासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ठ पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला होता.
त्यावेळी या गाण्याची जितकी हवा होती जी आजही कायम आहे तिच हवा या रिमेक गाण्याची होते का हे लवकरच कळेल. तसेच ब-याच वर्षानंतर अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री तब्बू ला एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्यामुळे, प्रेक्षकांमध्येही ह्या चित्रपटाविषयी खूपच उत्सुकता आहे. ह्याआधी सैफ आणि तब्बू 'हम साथ साथ है' हया चित्रपटात एकत्र दिसले होते.