लॉकडाऊन काळात नोरा फतेही ला होतोय 'हा' त्रास; इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. आतापर्यंत 3 वेळा देशातील लॉकडाऊन कालावधी वाढवण्यात आला आहे. अशातच आता बॉलिवुडमधील डान्सर नोरा फतेहीला (Nora Fatehi) निद्रानाश (Insomnia) चा त्रास जाणवू लागला आहे. नोराला सध्या झोप येत नाही आहे. यामागे लॉकडाऊन कारण असू शकते.
कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येणार आहे. आतापर्यंत 3 वेळा देशातील लॉकडाऊन कालावधी वाढवण्यात आला आहे. अशातच आता बॉलिवुडमधील डान्सर नोरा फतेहीला (Nora Fatehi) निद्रानाश (Insomnia) चा त्रास जाणवू लागला आहे. नोराला सध्या झोप येत नाही आहे. यामागे लॉकडाऊन कारण असू शकते.
दरम्यान, नोराने हा इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका टिकटॉक व्हिडिओमध्ये यासंदर्भात खुलासा केला आहे. नोराच्या चाहत्यांनी या व्हिडिओला लाईक तसेच कमेंन्टस दिल्या आहेत. 'जेव्हा मी झोपायचा प्रयत्न करते तेव्हा माझा निद्रानाश होतो. तुम्हालाही याचा सामना करावा लागतो आहे का?' अला सवाल नोराने आपल्या चाहत्यांना केला आहे. (हेही वाचा - Fact Check: पिठाच्या पिशवीतून पैसे वाटणारी व्यक्ती आमिर खान नाही; स्वतः ट्विट करून दिले स्पष्टीकरण, See Tweet)
सत्यमेव जयते या चित्रपटातील 'दिलबर' गाण्यामुळे नोरा घराघरात पोहोचली. नोराने डान्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नोरा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनेक डान्स व्हिडीओ शेअर करत असते. नोराचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.