Kareena Kapoor चा 40 हजारांचा T-Shirt पाहून नेटीझन्स झाले थक्क; म्हणाले, 'यापेक्षा जास्त चांगला टी-शर्ट बाजारात 200 रुपयांत मिळतो'
'यापेक्षा चांगला टी-शर्ट मंगळ बाजारमध्ये मिळतो,' अशी टिप्पणी एका वापरकर्त्याने केली आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने 'एवढ्या पैशात लग्नाचा ड्रेस आला असता', अशी कमेंट केली. तसेच एका सोशल मीडिया यूजर्सने 'यापेक्षा जास्त चांगला टी-शर्ट बाजारात 200 रुपयांत मिळतो,' असं म्हटलं आहे.
Kareena Kapoor Gucci Yellow T-Shirt: करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सहसा कॅज्युअल लूकमध्ये जास्त दिसते. करीनाला बहुतेकदा मुलगा तैमूरसोबत फिरताना आणि खेळताना स्पॉट केलं जातं. अलीकडेच, करिनाने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळा रंगाचा जॉगर्स परिधान केला होता. नेहमीप्रमाणे करीना कॅज्युअल लूकमध्ये स्टायलिश दिसत होती. पण, जेव्हा करीनाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा यूजर्सनी तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली.
वास्तविक, 'लाल सिंग चड्ढा' अभिनेत्री गुच्ची (GUCCI) ब्रँड लेबलचा पिवळा टी-शर्ट घालून बाहेर आली. हा ओव्हरसाईज टी-शर्ट करिनाने अँकल लेंथ निळ्या जीन्ससह परिधान केला होता. याशिवाय बेबोने ब्लॅक चष्मादेखील घातला होता. या लूकमध्ये कम्फर्टेबल होण्यासाठी करिनाने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची चप्पल कॅरी केली होती. (हेही वाचा - Pooja Hegde Airlines Controversy: पूजा हेगडेसोबत फ्लाईटमध्ये गैरवर्तन, ट्विट करून नाराजी केली व्यक्त)
करीना ट्रोल का झाली?
आता तुम्ही विचार करत असाल की, करीनाचा हा कॅज्युअल लूक पाहून सोशल मीडिया यूजर्सनी तिला ट्रोल का करायला सुरुवात केली? वास्तविक, GUCCI चे ब्रँड लेबल बेबोने घातले होते, त्याची किंमत 40 हजार रुपये आहे. जेव्हा यूजरला या साध्या टी-शर्टची किंमत समजली तेव्हा लोकांनी मजेशीर कमेंट करायला सुरुवात केली.
'यापेक्षा चांगला टी-शर्ट मंगळ बाजारमध्ये मिळतो,' अशी टिप्पणी एका वापरकर्त्याने केली आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने 'एवढ्या पैशात लग्नाचा ड्रेस आला असता', अशी कमेंट केली. तसेच एका सोशल मीडिया यूजर्सने 'यापेक्षा जास्त चांगला टी-शर्ट बाजारात 200 रुपयांत मिळतो,' असं म्हटलं आहे.
दरम्यान, महागड्या वस्तू किंवा आउटफिटसाठी करीनाला ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मिनी पर्स, घड्याळ यासारख्या जादा किमतीच्या वस्तूंमुळे करीनावर यूजर्सकडून अनेकदा टीका करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2022 03:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

