हॉट सेल्फीमुळे नाही तर मोबाईल कव्हरमध्ये ठेवलेल्या त्या गोष्टींमुळे सुहाना झाली ट्रोल
मोबाईलच्या कव्हरच्या मागच्या बाजूला ठेवलेल्या एटीएम कार्डमुळे सुहाना झाली ट्रोल
बॉलिवूड मध्ये येणा-या नवीन पिढीमुळे आज आपले सेलिब्रिटी स्वत:पेक्षा आपल्या मुलांमुळेच जास्त चर्चेत असतात. मग तो तैमूर(Taimur) असो, अबराम खान (AbRam) वा आराध्या(Aaradhya). यांच्याबरोबर बॉलिवूडची नवीन तरुण पिढीही तितकीच सोशल मिडियावर चर्चेत पाहायला मिळतात. त्यात त्यांना ट्रोल करणा-यांची संख्या देखील कमी नसते. बॉलिवूड बादशहा शाहरुख खान यांची मुलगी सुहाना (Suhana) नेहमीच तिच्या हॉट लूक मुळे सोशल मिडियावर ट्रोल होत असते. मात्र यावेळी ती तिच्या हॉट लूक मुळे नाही तर तिच्या मोबाईल कव्हरमध्ये ठेवलेल्या विशेष गोष्टींमुळे ट्रोल झाली आहे.
ह्या फोटोमध्ये नीट पाहा सुहाना ज्या मोबाईलमधून सेल्फी काढत आहे त्या मोबाईलच्या कव्हरच्या मागच्या बाजूला तिने ठेवलेले एटीएम कार्ड दिसतायत. त्यामुळे अनेक नेटक-यांना सुहाना देखील सामान्य मुलींप्रमाणे कव्हरमध्ये कार्ड ठेवते हे पाहून आनंद झाला तर काहींनी हे कार्ड जपून ठेव, कदाचित ह्या कार्डमध्ये कोट्यवधी रुपये असू शकतात असा सल्ला दिलाय.
सुहाना खान हिच्या हॉट ट्रेडिशनल लूकची सोशल मीडियात चर्चा; पहा Viral Photos
तर तिच्या चाहत्यांनी सुहाना देखील एटीएम कार्ड मोबाईल कव्हरमध्ये ठेवते, हे पाहून भुवया उंचावल्या आहेत. सुहाना नुकताच हा सेल्फी आपल्या इन्स्टा अकाऊंटवरुन शेअर केला होता. त्यातील तिच्या हॉट लूक पेक्षा तिच्या या सवयीवरच नेटक-यांनी कमेंट्सचा भडिमार केला.
याआधीही सुहाना खान ही तिच्या ट्रेडिशनल हॉट फोटोमुळे चर्चेत आली होती. सुहानाने हे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले होते.. यातील तिचा इंडो वेस्टर्न लूक लक्ष वेधून घेत आहे.