Drugs Case: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला NCB कडून पुन्हा समन्स, 16 डिसेंबरला होणार चौकशी

येत्या 16 डिसेंबरला पुन्हा त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Arjun Rampal (Photo Credits: Instagram)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर (Sushant Singh Rajput Case) बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट देखील समोर आले. यात आतापर्यंत अनेक दिग्गज अभिनेत्री आणि अभिनेत्यांची चौकशी करण्यात आली. NCB आतापर्यंत अनेकांना समन्स देखील पाठवले. त्यात अलीकडेच अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याच्या मुंबई स्थित घरात देखील NCB ने छापा टाकला. त्यानंतर त्याला समन्स बजावून त्याची चौकशीही करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा त्याला NCB कडून समन्स बजावण्यात आले आहे. येत्या 16 डिसेंबरला पुन्हा त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालची चौकशी करण्यात आली होती. त्याआधी अर्जुनची गर्लफ्रेंड गेब्रिएल हिची एनसीबीकडून जवळजवळ 6 तास चौकशी करण्यात आली. यावेळी तिचा भाऊ अगिसिलाओस याच्या ड्रग्ज संबंधित प्रश्न सुद्धा विचारले गेले. ऐवढेच नाही तर एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणाचा चांगलाच तपास केला जात असून बड्या कलाकारांची नावे सुद्धा यामध्ये समोर आल्याचे दिसून आले आहे.हेदेखील वाचा-Drug Case: अभिनेता अर्जुन रामपाल याचा मित्र Paul Bartel याला ड्रग्ज संबंधित प्रकरणात NCB कडून अटक

दरम्यान एनसीबीला अर्जुनच्या घरी ड्रग्ज सापडले नव्हते. एनसीबीने काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालच्या वांद्र्यातील घराची झडती घेतली होती. त्यावेळी एनसीबीने अर्जुनच्या घरातून त्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि टॅब जप्त केला होता. त्यावेळी अर्जुनच्या ड्रायव्हरचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रायडिसला चौकशीची नोटीस देण्यात आली होती.

आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणी दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, यांसह अनेक दिग्गज कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान मागील 2-3 दिवसात NCB ने मुंबईत 5 ठिकाणी धाड टाकली. यात अंधेरी, मालाड, खारघर, कोपरखैरणे आणि लोखंडवाला या ठिकाणी छापे टाकले आहेत. मुंबईतील ड्रग्ज कनेक्शन हळूहळू समोर येत असून आणखी कोणाची नावे समोर येतील हे काही दिवसांतच कळेल.