Nayanthara Apologises Post Annapoorani Controversy: नयनतारा (Nayanthara) स्टारर 'अन्नपूर्णानी' हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच वादात (Annapoorani Controversy) सापडला आहे. या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. अलीकडेच चित्रपटाच्या निर्मात्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवरून काढून टाकण्यात आला. आता नयनताराने पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा आणि टीमचा हेतू नव्हता, असे नयनताराने म्हटले आहे.
नयनताराने मागितली माफी -
'अन्नपूर्णानी' या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप झाल्यानंतर नयनताराने माफी मागितली आहे. नेटफ्लिक्सवर चित्रपट रिलीज झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करत अभिनेत्रीने गुरुवारी रात्री उशिरा तिच्या Instagram खात्यावर एक विधान जारी केले. जय श्री रामने सुरुवात करून अभिनेत्रीने नोटमध्ये लिहिले की, 'सकारात्मक संदेश शेअर करण्याच्या आमच्या प्रामाणिक प्रयत्नात अनवधानाने चूक झाली. याआधी चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात आलेला सेन्सॉर केलेला चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला जाईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. मी मनापासून माफी मागते. (हेही वाचा - Annapoorani Controversy: नेटफ्लिक्सवरून काढला 'अन्नपूर्णी' चित्रपट; 'प्रभू रामाचा अनादर' केल्याप्रकरणी अभिनेत्री Nayanthara विरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण)
View this post on Instagram
नयनताराने पुढे म्हटलं आहे की, 'माझा आणि माझ्या टीमचा कधीही कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आम्हाला या समस्येचे गांभीर्य समजते. माझा देवावर पूर्णपणे विश्वास आहे. ज्यांच्या भावना आम्ही दुखावल्या आहेत त्यांची मी मनापासून माफी मागते. अन्नपूर्णानींमागचा हेतू संकट निर्माण करण्याचा नसून उन्नती आणि प्रेरणा देण्याचा होता. गेल्या दोन दशकांमध्ये, चित्रपटसृष्टीतील माझा प्रवास एकाच हेतूने निर्देशित केला आहे- सकारात्मकता पसरवणे आणि एकमेकांकडून शिकणे वाढवणे. (हेही वाचा - FIR Against Annapoorani Makers: 'भगवान राम मांसाहार करत होते'; धार्मिक भावना दुखावल्याने नयनताराच्या 'अन्नपूर्णानी'च्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल)
नयनताराने या चित्रपटात अन्नपूर्णानीची मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट एका पुराणमतवादी ब्राह्मण कुटुंबातील एका महिलेभोवती फिरतो जिला भारतातील टॉप शेफ बनायचे आहे. चित्रपटात अनेक सीन्स आहेत, ज्यात त्यांचा संघर्ष दिसून येतो. चित्रपटात 'अन्नपूर्णानी'ची एक मैत्रिण तिला मांस खायला देण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नात, वर्गमित्राने भगवान रामाचा उल्लेख केला आणि दावा केला की, ते देखील मांस खात होते आणि ते पाप नाही. या दृश्यावरून गदारोळ झाला असून, या चित्रपटाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. तसेच, OTT प्लॅटफॉर्म Netflix वरून हा चित्रपट काढून टाकण्यात आला आहे. या चित्रपटामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी नेते रमेश सोळंकी यांनी या चित्रपटाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.