Akhil-Zainab Wedding: नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनीने मैत्रीण झैनब रावद्जीशी बांधली लग्नगाठ; पहा फोटोज
Akhil-Zainab Wedding: दक्षिणेतील सुपरस्टार नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनी (Akhil Akkineni) ने त्याची दीर्घकाळची मैत्रीण झैनब रावद्जी (Zainab Ravdjee) शी लग्न केले आहे. हे जोडपे शुक्रवारी, 6 जून रोजी लग्नबंधनात अडकले. झैनब आणि अखिल तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. या जोडप्याने 26 नोव्हेंबर 2024 रोजी लग्न केले. आता या जोडप्याने कुटुंब आणि जवळच्या मित्रांमध्ये पारंपारिक हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये नागार्जुन मुलाच्या लग्नात काही महत्त्वाचे विधी पार पाडताना दिसत आहेत.
हैदराबादमध्ये झालेल्या या लग्नात चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली. ज्यात चिरंजीवी, राम चरण आणि प्रशांत नील सारख्या मोठ्या नावांचा समावेश होता. लग्नाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, अखिल आणि झैनबने पारंपारिक तेलुगु पोशाख घातले होते, ज्यामध्ये वधूने सोन्याच्या दागिन्यांसह आयव्हरी पेस्टल साडी परिधान केलेली दिसली. अखिल साध्या पांढऱ्या कुर्ता आणि धोतरीत दिसला.
अखिल अक्किनेनीने मैत्रीण झैनब रावद्जीशी बांधली लग्नगाठ -
ఈ ఉదయం బ్రహ్మ ముహూర్తం లో 👌🏻
కుటుంబ సభ్యులు అత్యంత సన్నిహితుల మధ్య అఖిల్ జైనబ్ ల వివాహం!#AkhilAkkineni#AkhilZainab@iamnagarjuna @AkhilAkkineni8 😍 pic.twitter.com/Ovg1jPmtU9
— ANJANEYA REDDY.C (@ANJI_AKKINENI) June 6, 2025
कोण आहे नागार्जुनची धाकटी सून झैनब?
झैनबबद्दल बोलायचे झाले तर, ती एका आदरणीय आणि यशस्वी कौटुंबिक पार्श्वभूमीतून आली आहे. तिचे वडील, झुल्फी रवादजी, बांधकाम उद्योगातील एक आघाडीचे व्यक्तिमत्व आहेत, ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील अग्रणी मानले जाते. तिचा भाऊ, जैन रवादजी, भारतातील स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख नाव असलेल्या झेडआर रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2025 03:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

