संघर्षाच्या काळात माझ्या मित्रांनी मला साथ दिली, नाहीतर मी देखील आत्महत्या करणार होतो; बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी याची इंस्टाग्रामवर खळबळजनक पोस्ट
सुशांत सिंह यांच्या आत्महत्येनंतर बॉलिवडमधील अनेक कलाकारांनी आपल्या जीवनातील कठिण प्रसंग सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुशांत सिंह यांच्या आत्महत्येनंतर बॉलिवडमधील अनेक कलाकारांनी आपल्या जीवनातील कठिण प्रसंग सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवणारे मनोज वाजपेयी (Manoj Vajpayee) यांनीही इंस्टाग्रामवर (Instagram) आपला अनुभव सांगितला आहे. संघर्षाच्या काळात माझ्या मित्रांनी मला साथ दिली, नाहीतर मी देखील आत्महत्या करणार होतो, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. मनोज वाजपेयी यांच्या या पोस्टनंतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या भुवया उचावल्या आहेत. याशिवाय बिहार ते बॉलिवूड हा प्रवास कसा होता, याचीही माहिती मनोज वाजपेयी यांनी दिली आहे.
मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. बिहारमधल्या एका गावात पाच भावंडांसोबत मी लहानाचा मोठा झालो. एका झोपडीच्या शाळेत मी शिकलो आहेमचे आयुष्य खूप साध होते. परंतु, जेव्हा आम्ही शहरात जायचो, त्यावेळी सिनेमागृहात चित्रपट पाहायला नक्की जात असे. मी अमिताभ बच्चन यांचा चाहता होता. मला त्यांच्यासारखे बनायचे होते. मला अभिनयाची आवड होती, हे मला वयाच्या नवव्या वर्षीच समजले. त्यामुळे आभ्यासातही माझे लक्ष लागत नव्हते. अखेर वयाच्या 17 व्या वर्षी मी दिल्ली युनिव्हर्सिटीत दाखल झालो. तिथे मी नाटकात काम केले आणि हे माझ्या कुटुंबीयांना माहित नव्हते. काही दिवसानंतर मी माझ्या वडिलांना पत्र लिहून याबाबत सांगितले होते. परंतु, ते रागावले नसून त्यांनी माझी फी भरण्यासाठी 200 रुपये पाठवले होते. गावातले लोक नेहमी माझ्याविषयी चुकीचे बोलायचे. मात्र, मी त्याकडे दुर्लक्ष करायचो. दरम्यान, एनएसडीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मी अर्ज केला होता. परंतु, 3 वेळा माझा अर्ज नाकारला गेला होता. त्यावेळी मी आत्महत्या करणार होतो. मी आत्महत्या करेल की काय म्हणून माझे मित्र माझ्या बाजूलाच झोपत असे. त्यांनी कधीच मला एकट्याला सोडले नाही. माझा प्रवेश होईपर्यंत त्यांनी माझी साथ दिली. त्यावर्षी मी एका चहावाल्याच्या दुकानात असताना तिग्मांशू त्याच्या खटारा स्कूटरवर मला शोधत आला. शेखर कपूरने मला ‘बँडिट क्वीन’मध्ये भूमिकेची ऑफर दिली. तेव्हा मी मुंबईत राहायला आलो. हे देखील वाचा- The Life After Life: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी मृत्यूनंतर अवयव दान करण्याचे घेतला निर्णय; पाहा संपूर्ण व्हिडिओ
मनोज वाजपेयी यांची इंस्टाग्राम पोस्ट-
बँडिट क्वीन या चित्रपटातून मनोज वाजपेयी यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. मनोज वाजपेयी यांनी तेलगू आणि तामिळ चित्रपटात झळकले आहेत. आज मोठ्या कलाकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.