बॉलिवूड अभिनेत्री Kangana Ranaut आणि बहिण Rangoli Chandel यांची समस्या वाढली, मुंबईत देशद्रोहच्या विविध कलमाअंतर्गत FIR दाखल

Rangoli Chandel and Kangana Ranaut. (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड मधील अभिनेत्री कंगना रनौत हिच्या मागील समस्या अधिक वाढतच चालल्या आहेत. कर्नाटक येथे एफआयआर दाखल केल्यानंतर आता मुंबईतील वांद्रे पोलीस स्थानकात सुद्धा कंगना हिच्या विरोधात ट्विट आणि मुलाखतीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली एफआरआर दाख करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी कंगना आणि तिची बहिण रंगोली चंडेल हिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.(Kangana Ranaut वर सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप; FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश)

दोन्ही बहिणांच्या विरोधात पोलिसांनी देशद्रोहाच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये IPC कलम 154A, 295A, 124A, 34 यांचा समावेश आहे. या कायदेशीर कलमाअंतर्गत पोलिसांकडून या दोन्ही बहिणींना अटक केली जाऊ शकते.(Sanjay Raut On Kangana Ranaut: 'अपमान विसरलेलो नाही, वेळ आली की सांगू' संजय राऊत यांची कंगना रनौत हिच्यावर अप्रत्यक्ष टीका)

दरम्यान, मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद नावाच्या याचिकाकर्त्यांनी कोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये कंगना आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांचे ट्विट हिंसात्मक असल्याचे म्हणत त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. कोर्टात याचिकेवर सुनावणी केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.