T-Series Vs MrBeast: चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी टी-सिरीजने पुढे केला भारती अस्मितेचा मुद्दा, लोकांनी ट्रोल करत विचारले सवाल

जगातील सर्वाधिक सबस्क्राइबर्स असण्याचा रेकॉर्ड गेल्या कित्येक वर्षांपासून टी-सीरीजच्या नावे आहे. मात्र आता MrBeast या इन्फ्लुएन्सरचे सबस्क्राइबर्स हे 253 मिलियन झाले आहेत.

फिल्म प्रॉडक्शन कंपनी असलेल्या टी-सीरीजचे यूट्यूबवर सर्वाधिक सबस्क्राइबर्स आहेत. सध्या युट्यूबर्सवर 263 मिलीयन सबस्क्राइूबर्स आहे. मात्र टी-सीरीजचं हे पहिलं स्थान आता धोक्यात आलं आहे. कारण मिस्टर बीस्ट (MrBeast) नावाचं चॅनल आता T-Series पासून केवळ 11 मिलियन सबस्क्राइबर्स दूर आहे म्हणजेच त्यांचे सबस्क्राइबर्स जवळपास 253 मिलीयन आहेत. यामुळे टी-सीरीजने एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राइब करण्याचं आवाहन भारतीयांना केलं आहे. (हेही वाचा - Zee-Sony Deal: झीचे सोनीसोबतचे विलीनीकरण रद्द; कंपनीने मागे घेतले NCLT समोरील मर्जर इम्प्लीमेंटेशन ॲप्लिकेशन)

पाहा व्हिडिओ -

टी-सीरीजचे यूट्यूबवर 263 मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. जगातील सर्वाधिक सबस्क्राइबर्स असण्याचा रेकॉर्ड गेल्या कित्येक वर्षांपासून टी-सीरीजच्या नावे आहे. मात्र आता MrBeast या इन्फ्लुएन्सरचे सबस्क्राइबर्स हे 253 मिलियन झाले आहेत.  यूट्यूब सबस्क्राइबर्सची ही लढाई टी-सीरीजने भारतीयांच्या अस्मितेची केली आहे. तुम्ही जर भारतीय असाल, तर 'टी-सीरीज'ला फॉलो करा असं आवाहन टी-सीरीज करत आहे. लेट्स युनाईट अँड क्रिएट हिस्ट्री नावाचा व्हिडिओ  शेअर केला आहे.

यापूर्वी 2019 साली टी-सीरीज आणि प्युडीपाय या यूट्यूबरमध्ये अशाच प्रकारची लढाई पहायला मिळाली होती. यावेळी देखील टी-सीरीजने भारतीय अस्मितेचा मुद्दा पुढे करत सबस्क्राइबर्स मिळवले होते.  या सगळ्यात काही नेटिझन्स टी-सीरीजचं समर्थन करताना दिसत आहेत. मात्र, कित्येकांनी टी-सीरीजला ट्रोल देखील केलं आहे. एखाद्या कंपनीचे सबस्क्राइबर्स वाढवणे हा देशाच्या अस्मितेचा मुद्दा कसा असू शकतो? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.