Budget 2019: पायरसी विरोधात लढण्यासाठी मोदी सरकारचा मास्टर प्लॅन, सिनेनिर्मात्यांसाठी सरकारचं खास गिफ्ट
आता पायरसीविरोधात सरकारने कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत अंतरिम बजेट 2019 मध्ये घोषणा करण्यात आली आहे.
अर्थमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी लोकसभेमध्ये अंतरिम बजेट (Interim Budget 2019) सादर केलं आहे. त्यांनी सिनेसृष्टीसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. एका सिनेमाच्या निर्मितीसाठी अनेक कलाकारांची मेहनत असते. मात्र पायरसीमुळे (Piracy) सिने निर्मात्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. आता पायरसीविरोधात सरकारने कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
सिनेमांना मिळणार सिंगल विंडो क्लिअरन्स
चित्रपटांना रस्ता मोकळा करून देण्याची प्रक्रिया आता अधिक सुकर होणार आहे. चित्रपटांना आता सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टम (single window clearance)लावण्यात येणार आहे. Budget 2019: करदात्यांसाठी खूषखबर, 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, 2019-2020 आर्थिक वर्षात पहा कोणाला, कसा भरावा लागणार Income Tax
पायरसी विरोधात सरकार करणार कडक कारवाई
सिनेमा ऑनलाईन लीक होणं आणि पायरसी रोखण्यासाठी सिनेमॅटोग्राफी अॅक्टमध्ये बदल करण्यात आले आहेत. अॅन्टी कॅम कॉर्डिंग प्रोविजन (anti-cam cording provision) देण्यात येईल. यामुळे सिनेमागृहामध्ये चित्रपट रेकॉर्ड करण्यावर कायदेशीररित्या बंदी घालण्यात येणार आहे. सरकारचा हा निर्णय सिनेनिर्मात्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.