Milind Soman Tested COVID-19 Positive: बॉलिवूडकरांना कोरोनाचा विळखा! आमिर खान, आर माधवनपाठोपाठ मिलिंद सोमणला कोरोनाची लागण

अभिनेता तसेच हॉट मॉडल मिलिंद सोमण (Milind Soman) याची देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) आली आहे. या अभिनेत्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

Milind Soman (Photo Credits: Instagram)

सामान्य नागरिकांसह कोरोना व्हायरस झपाट्याने बॉलिवूडकरांचा पाठलाग करत आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांसह, गायक, दिग्दर्शकांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी परफेक्शनिस्ट आमिर खान याला कोरोनाची लागण झाल्याचे कळले. त्यापाठोपाठ आर माधवन याला देखील कोरोनाने घेरले. त्यानंतर आता अभिनेता तसेच हॉट मॉडल मिलिंद सोमण (Milind Soman) याची देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) आली आहे. या अभिनेत्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

आतापर्यंत अनेक बड्या स्टार्सला कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. त्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, रणबीर कपूर, गौहर खान यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर मराठीतील अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यात प्रिया बापट- उमेश कामत, गायक महेश काळे, विराजस कुलकर्णी यांसारख्या अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे.हेदेखील वाचा- Aamir Khan पाठोपाठ R Madhavan ला देखील Covid-19 ची लागण; 3 Idiots च्या मजेदार अंदाजात ट्वीट करत दिली माहिती

आमिर खान, कार्तिक आर्यन, आर माधवननंतर मिलिंद सोमण याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली असून क्वारंटाईन असल्याचे सांगितले आहे.

आर माधवन कोविड पॉझिटिव्ह आल्यावर त्याने '3 इडियट्स' च्या अंदाजात मजेशीररित्या ही माहिती आपल्या चाहत्यांना सोशल मिडियाद्वारे दिला. आर माधवनने ट्वीट केलेली खास पोस्ट अशी आहे- 'फरहान ला तर रॅंचोला फॉलो करायलाच पाहिजे. 'वायरस' तर आमच्या मागे कायमच होता. पण यावेळेस त्याने आम्हांला पकडलं आहे. पण ऑल इज वेल. लवकरच कोविड देखील खड्ड्यात जाईल. ही एक अशी गोष्ट आहे जिथे आम्हांला 'राजू'ला येऊ द्यायचं नाहीए. तुमच्या सार्‍यांच्या प्रेमासाठी धन्यवाद. कोविड मधून चांगल्या प्रकारे बाहेर पडतोय.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement