Milind Soman ने FIR दाखल झाल्यानंतर पत्नी अंकिता कोंवरसोबत शेअर केला हॉट फोटो; पहा शर्टलेस अंदाज

बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) वर नुकताच गोव्याच्या समुद्रकिनार्‍यावर न्यूड फोटो (Nude Photo) सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. स्वतःच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मिलिंदने पत्नी अंकिता कोंवर (Ankita Konwar) हिच्यासमवेत फोटो पोस्ट करून त्याला ट्रॉल करणाऱ्या नेटीझन्सला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Milind Soman ने FIR दाखल झाल्यानंतर पत्नी अंकिता कोंवरसोबत शेअर केला हॉट फोटो; पहा शर्टलेस अंदाज
Milind Soman with wife Ankita Konwar (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) वर नुकताच गोव्याच्या समुद्रकिनार्‍यावर न्यूड फोटो (Nude Photo) सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 4 नोव्हेंबर रोजी त्याने आपला 55 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त मिलिंद आणि त्याची पत्नी गोव्यात आले होते. यावेळी मिलिंद आपल्या तंदुरुस्तीकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर नग्न अवस्थेत धावताना दिसला. विशेष म्हणजे त्याने या घटनेच्या फोटो काढून तो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर सर्वांनाचं आश्चर्य वाटलं. या फोटोवरून नेटीझन्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर मिलिंदवर एफआयआर दाखल करण्यात आला.

स्वतःच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मिलिंदने पत्नी अंकिता कोंवर (Ankita Konwar) हिच्यासमवेत फोटो पोस्ट करून त्याला ट्रॉल करणाऱ्या नेटीझन्सला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. या फोटोमध्ये तो शर्टलेस दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना मिलिंदने लिहिलं आहे की, "सर्वत्र सुर्यास्त सुंदर आहे, मुळ वातावरणात, जिथे माणसाचे मन बदललेले नाही, जिथे हवा स्वच्छ आहे आणि पृथ्वी शुद्ध आहे, किंवा अगदी मानवी वापरामुळे प्रदूषित झालेल्या ठिकाणी, जेथे मानवांना श्वास घेणं अशक्य वाटेल. परिस्थिती काहीही असो, सूर्यास्त सुंदर असतो आणि हा सूर्यास्त आपला आत्मविश्वास वाढवू शकतात. हा सूर्यास्त आपल्याला सोप्या, अधिक सुंदर आणि सकारात्मक जीवनासाठी प्रेरित करू शकतात." (हेही वाचा - अभिनेता Milind Soman याच्या विरोधात गोवा बीचवरील धावतानाचा Naked फोटो सोशल मीडियात पोस्ट केल्याने गुन्हा दाखल)

मिलिंदच्या या फोटोला सोशल मीडियावर बर्‍याच लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. गोव्यात नुकत्याच झालेल्या न्यूड फोटोशूटमुळे पूनम पांडे आणि तिचा नवरा सॅम बॉम्बे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. गोव्याच्या बीचवरील न्यूड फोटो शेअर केल्याप्रकरणी मिलिंद सोमण याच्या विरोधात आयपीसी सेक्शन 29, सेक्शन 67 आणि आयटी अॅक्ट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 08, 2020 09:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).