Milind Soman याने नथ, काजळ, कुंकू लावून शेअर केला सर्वांना अचंबित करणारा फोटो, चाहत्यांनी विचारले लक्ष्मी चित्रपटाचे प्रमोशन करत आहात का?

इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करुन 'ट्रॅव्हल ट्युसडे! मला माहित आहे की ही काही होळी नाही आहे

Milind Soman (Photo Credits: Instagram)

गेल्या काही दिवसांपासून हॉट मॉडेल अभिनेता मिलिंद सोमणचे (Milind Soman) नाव बरेच चर्चेत आहे. त्याने सोशल मिडियावर नग्न अवस्थेत समुद्रकिनारी धावत असताना फोटो व्हायरल झाल्यानंतर तो अधिकच चर्चेत आला. इतका की त्याच्यावर पोलिसात FIR दाखल करण्यात आली. त्यात आता त्याने आपला एक अचंबित करणारा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने डोळ्यांत काजळ लावले आहे, नाकात नथ घातली आहे आणि चेह-याला कुंकू लावले आहे. हा फोटो पाहून त्याचे चाहतेही बुचकळ्यात पडले आहे. यावर अनेकांनी तर त्याला 'लक्ष्मी' (Laxmii) चित्रपटाचे प्रमोशन करत आहेस का असा प्रश्न विचारला आहे.

मिलिद सोमण चा हा फोटो सोशल मिडियावर बराच व्हायरल झाला असून यावर त्याच्या चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क काढले आहेत. इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करुन 'ट्रॅव्हल ट्युसडे! मला माहित आहे की ही काही होळी नाही आहे. मात्र मुंबईजवळील कर्जत येथे मी खूप चांगले दिवस घालवले. आता चेन्नईला जात आहे. लवकरच आणखी काही शेअर करेन' असे या पोस्टखाली मिलिंदने म्हटले आहे. हेदेखील वाचा- Milind Soman ने FIR दाखल झाल्यानंतर पत्नी अंकिता कोंवरसोबत शेअर केला हॉट फोटो; पहा शर्टलेस अंदाज

 

View this post on Instagram

 

Travel Tuesday! I know its not holi but spent the last few days in Karjat near Mumbai doing some fun things - will share more soon 😋 now off to Chennai!

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

तर या फोटोला पाहून त्याच्या पत्नीने अंकिता कोंवर याने कमाल असे म्हटले आहे. तर हा फोटो पाहून त्याच्या असंख्य चाहत्यांनी तू लक्ष्मी चित्रपटाचे प्रमोशन करत आहेस का असा प्रश्न विचारला आहे.