Met Gala 2019: प्रियांका चोप्रा मेट गाला मधील लूकवरुन सोशल मीडियात ट्रोल

मेट गाला 2019 मध्ये अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती ही एका हटके लूकमध्ये पाहायला मिळाली.

Priyanka Chopra (Photo Credits-Instagram)

मेट गाला 2019 (Met Gala 2019) मध्ये अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती ही एका हटके लूकमध्ये पाहायला मिळाली. परंतु सोशल मीडियावर प्रत्येकजण प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिच्या लूक बद्दल चर्चा करत आहेत. प्रियांकाने सफेद रंगाना गाऊन घातला होता. तर लूक जरा हटके करण्यासाठी प्रियांकाने आपले केस कुरळे केल्याचे दिसून आले. प्रियांकाच्या चाहत्यांना तिचा हा लूक फार आवडला असून नेटकऱ्यांनी मात्र तिला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

एका नेटकऱ्याने प्रियांकाच्या या लूकवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असे म्हटले आहे की, एका वर्षात टूथब्रशची हालत होते तसे प्रियाकांचे केस तिने केले आहेत. तर दुसऱ्याने असे म्हटले आहे की, हिच्यासोबत काय चुकीचे घडले आहे. असे घराबाहेर फिरण्यापेक्षा घरात बंद खोलीत रहा. काहींनी तर पिकाचू प्रियांका म्हणून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

(Met Gala 2019: प्रियंका चोप्रा, दीपिका पदूकोन आणि ईशा अंबानी यांच्या मेट गाला 2019 मधील लूक्स सोशल मीडियात व्हायरल)

प्रियांका चोप्रा तिचा आगामी चित्रपट द स्काय इज पिंक मध्ये झकळणार आहे. यामध्ये फरहान अख्तर सुद्धा मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे. शोनाली बोस चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.