Manikarnika Box Office Collection Day 4: मणिकर्णिका चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाईत घसरण, 60 Cr कमाई करणे पण मुश्किल

रविवारी मणिकर्णिका चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई घसरत चालली असल्याचे दिसून आले. रविवारीच्या दिवशी चित्रपटाने फक्त 15.70 करोड रुपयेच कमावले.

कंगना रानौत (Photo Credits: File Photo)

Manikarnika Box Office Collection Day 4:  अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'मणिकर्णिका: द क्विन ऑफ झासी'(Manikarnika:The Queen of Jhansi) हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शित झाल्याच्या काही काळातच मणिकर्णिका प्रेक्षकांच्या पसंदिस पडला. तर चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 8.75 करोड रुपयांची कमाई केली. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच शनिवारी (26 जानेवारी) रोजी मोठा दिला मिळत 18.10 करोड रुपयांची कमाई केली.

मात्र रविवारी मणिकर्णिका चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई घसरत चालली असल्याचे दिसून आले. रविवारीच्या दिवशी चित्रपटाने फक्त 15.70 करोड रुपयेच कमावले. तर चौथ्या दिवशी ही चित्रपटाच्या कमाईत खूप घसरण झाली. ट्रेन्ड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते सोमवरी मणिकर्णिकाने जवळजवळ 5.10 करोड रुपयांची कमाई केली. त्याप्रमाणे सोमवार पर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई 47.88 करोड रुपये एवढी झाली आहे. (हेही वाचा-'ठाकरे'वर ‘मणिकर्णिका’ची मात; दोन दिवसांच्या उलाढालीनंतर ही आहे कमाईची आकडेवारी)

 

View this post on Instagram

 

#Repost @viralbhayani (@get_repost) ・・・ Two days 27+16 Sunday = 43 India and 10 CR overseas for 3 days !! 53 weekend world wide !! Inspite Uri sustaining .... Manikarnika is leading pack of the films !! 2019 haa been very good so far for the films. #manikarnika #boxoffice @viralbhayani

A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on

या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाई सर्वात जास्त दिल्ली, एनसीआर, युपी, राजस्थान आणि पंजाब येथे होत आहे. कंगना रनौत हिचा सर्वात उत्तम असा चित्रपट असून तो तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now