Arjun Kapoor Birthday: मलाइका अरोड़ा ने अर्जुन कपूर ला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! पहा तिची इंस्टाग्राम पोस्ट!
हॅन्डसम लूकमधील अर्जुनचा फोटो शेअर करताना मलायकाने 'हॅप्पी बर्थडे माय सनशाईन' असं कॅप्शन दिलं आहे.
बॉलिवूडचा इश्कजादा म्हणजेच अर्जुन कपूर (Arjun Kapoor)आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुनचा आजचा दिवस खास करण्यासाठी बॉलिवूडमधून त्याच्या मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशामध्येच त्याची खास मैत्रिण आणि कथित गर्लफ्रेंड मलायका अरोरा (Malaika Arora)ने देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शुभेच्छा देत त्याचा वाढदिवस खास केला आहे.
मलायकाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या सटोरीमध्ये अर्जुनचा एक खास फोटो शेअर केला आहे. हॅन्डसम लूकमधील अर्जुनचा फोटो शेअर करताना मलायकाने 'हॅप्पी बर्थडे माय सनशाईन' असं कॅप्शन दिलं आहे.
मलायका अरोराची पोस्ट
मलायका अरोरा आणि अर्जून कपूर यांनी मागील वर्षी अर्जुनच्या बर्थ डे दिवशी त्यांच्या नात्याला सोशल मिडियावर पब्लिकली स्वीकारलं होतं. त्यानंतर अनेकदा ते पार्टीमध्ये, सोशल गॅदरिंगमध्ये एकत्र दिसले. दरम्यान त्यांच्या लग्नाची चर्चा होती. मात्र त्यावर अजूनही कोणतीही प्रतिक्रिया देणं त्या दोघांनीही देणं टाळलं आहे.
अर्जुन कपूर लवकरच दिबाकर बॅनर्जी यांच्या ' संदीप अऑर पिंकी फरार' या सिनेमामध्ये झळकणार आहे. या सिनेमामध्ये सर्जुन सोबत अभिनेत्री परिणीती चोपडा दिसेल.