Malaika Arora च्या 'AM' Pendant चा अर्जुन कपूर सोबत नव्हे तर 'या' गोष्टीशी संबंध

मलायका अरोराने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये 'MA' म्हणजे मलायका अरोरा (Malaika Arora) असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

Malaika Arora and Arjun Kapoor (Photo Credit: Instagram)

अभिनेत्री मलयाका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाझ खान (Arbaz Khan) यांच्या घटस्फोटानंतर आता तिचं नाव अभिनेता अर्जुन कपुर (Arjun Kapoor) सोबत जोडलं जात आहे. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी मलायका (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर  (Arjun Kapoor) यांना एकत्र पाहण्यात आलं आहे. काल मलायकाच्या गळयातील नवं  'AM' Pendant खूपच चर्चेमध्ये आलं होतं. यामधील आद्यक्षरं अर्जुन आणि मलायका असा संकेत देत आहेत का ? हा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला होता. पण काही तासातच मलायकाने सार्‍या चर्चांवर पूर्णविराम लावला होता. Malaika Arora चे खास पेडेंट; हा Arjun Kapoor सोबतच्या नात्याचा इशारा? (Photo)

मलायका अरोराने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये  'MA'  म्हणजे मलायका अरोरा (Malaika Arora) असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. यांच्याकडून मिळालेलं गिफ्ट असल्याच म्हटल आहे. फोटो हा मिरर इमेज असल्याने सुरूवातीला 'AM'  आणि नंतर 'MA' असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

Malaika Arora's Instagram story

अर्जुन आणि मलायकामधील जवळीक वारंवार दिसून येत असली तरीही त्यांच्याकडून नात्याबद्दल जाहीर कबुली देण्यात आलेली नाही. मलायकाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील नावातून तिने आता 'खान' हे आडनाव मात्र काढून टाकले आहे.