बॉलिवूडची हॉट अभिनेत्री आणि मॉडल मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. तिचा फिटनेस (Fitness), हॉटनेस (Hotness) आणि रिलेशनशीप (Relationship) हा कायम चर्चेचा विषय ठरत आलाय. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली ही अभिनेत्री आपल्या फोटोज, व्हिडिओजमुळे चाहत्यांना खिळवून ठेवते. आता देखील तिने एक हॉट व्हिडिओ (Hot Video) शेअर केला आहे. त्यात तिचा बिकीनी लूक, घायाळ करणाऱ्या अदा आणि मागे वाजणारे ‘मेहबुबा मेहबुबा’ हे गाणे यामुळे हा व्हिडिओ चाहत्यांना भावला आहे. त्यातील तिचा लूक चाहत्यांना दंग करतो.
या व्हिडिओवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी देखील कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्याचबरोबर चाहत्यांकडून भरभरुन प्रशंसा देखील केली जात आहे. (Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या स्ट्रेच मार्क्सवरून सोशल मीडियावर राडा)
पहा व्हिडिओ:
View this post on Instagram
मलायकाच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे तिचे वय लपले जाते. मलायका सिनेसृष्टीपासून दूर असली तरी तिची लोकप्रियता अद्याप कमी झालेली नाही. दरम्यान, मलायका अरोरा अजून एका गोष्टीमुळे सातत्याने चर्चेत असते ते म्हणजे तिची अर्जुन कपूर सोबतची रिलेशनशीप. अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर आपल्या पेक्षा 11 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूर सोबत मलायकाचे सुत जुळले. मलायकाचा पूर्वी विवाह झाला असून तिला 2 मुले देखील आहेत आणि अर्जुन कपूर अविवाहीत त्यात तिच्यापेक्षा लहान यामुळे यांचे नाते चर्चेचा विषय ठरले होते.