Ludo Trailer: अभिषेक बच्चन, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी ची भूमिका असणाऱ्या 'लुडो' चित्रपटाचा कॉमेडी ट्रेलर लाँच; पहा व्हिडिओ
लुडो' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. सध्या सोशल मीडियावर लुडो चित्रपटाचा ट्रेलर प्रचंड व्हायरल होत आहे. या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, आदित्य रॉय कपूर, सान्या मल्होत्रा यासारख्या दमदार कलाकारांच्या भूमिका आहेत.
Ludo Trailer: 'लुडो' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. सध्या सोशल मीडियावर लुडो चित्रपटाचा ट्रेलर प्रचंड व्हायरल होत आहे. या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), राजकुमार राव (Rajkumar Rao), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor), सान्या मल्होत्रा यासारख्या दमदार कलाकारांच्या भूमिका आहेत. अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अनेक कॉमेडी सीन दाखवण्यात आले आहेत. हा ट्रेलर पाहून तुम्ही नक्की लोट-पोट व्हाल. हा चित्रपट बटरफ्लाय प्रभावाने प्रेरित असल्याचे म्हटलं जाते. याचा अर्थ असा की, चित्रपटातील प्रत्येक पात्र एकमेकांशी जोडलेले आहे. त्यामुळे प्रत्येकजण कधीना-कधी एकमेकांना भिडतील. या ट्रेलरमध्ये अभिषेकपासून राजकुमारपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःच्या समस्या दाखवण्यात आल्या आहेत. यात अभिषेकने एका लहान मुलीचं अपहरण केलं आहे. तसेच एकाने आपल्या प्रेमिकासाठी एका गुन्हेगाराची कारागृहातून सुटका केली आहे. ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेममध्ये प्रेक्षकांचं मोठ्या प्रमाणात मनोरंजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, या चित्रपटाद्वारे अनुराग बासू देखील बर्याच दिवसांनी पुनरागमन करीत आहेत. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, ते बर्याच वर्षांपासून लुडो चित्रपट बनवण्याच्या विचार करत होते. ही संकल्पना बर्याच दिवसांपासून मनात चालू होती. या चित्रपटाची कथा खरोखर लुडोसारखी आहे. यात चार कथा एकत्र दाखवण्यात आल्या आहेत. या सर्व कथा एकत्र जोडल्या आहेत. हा चित्रपट एक डार्क कॉमेडी आहे, ज्यात काही प्रमाणात रोमान्स देखील दाखवण्यात आला आहे. (हेही वाचा - 'Dilwale Dulhania Le Jayenge' चित्रपटाचे 25 वर्ष पूर्ण; 2021 मध्ये लंडनच्या लीसेस्टर चौकात शाहरुख खान आणि काजोल यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार)
लुडो चित्रपट 12 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची थेट स्पर्धा 9 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार्या अक्षयच्या 'लक्ष्मी बॉम्ब'शी होणार आहे. सध्या सोशल मीडियावर लुडोचा ट्रेलर प्रचंड व्हायरल झाला असून तो प्रेक्षकांना लोट-पोट होण्यास भाग पाडत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2020 04:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

