Lata Mangeshkar Building Sealed: लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज इमारतीत कोरोनाचे 11 रुग्ण; BMC कडून इमारत सील

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून प्रभुकुंज इमारत सील करण्यात आली आहे. लता मंगेशकर आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित आहे. प्रभुकुंज इमारतीत वयोवृद्ध व्यक्तीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे BMC ने शनिवारी रात्री संपूर्ण इमारत सील केली.

लता मंगेशकर (Photo Credits: Facebook)

Lata Mangeshkar Building Sealed: ग्रानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) राहत असलेल्या मुंबईतील पेडर रोडवरील 'प्रभुकुंज' इमारतीत (Prabhu Kunj Building) 11 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून प्रभुकुंज इमारत सील करण्यात आली आहे. लता मंगेशकर आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित आहे. प्रभुकुंज इमारतीत वयोवृद्ध व्यक्तीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे BMC ने शनिवारी रात्री संपूर्ण इमारत सील केली.

प्रभुकुंज सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर राहत आहेत. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. यात म्हटलं आहे की, 'आम्हाला आज संध्याकाळपासून प्रभुकुंज सोसायटी सील करण्याबाबत फोन येत आहेत. प्रभुकुंज सोसायटीतील रहिवासी आणि महापालिका प्रशासनाने मिळून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. वयस्कर रहिवाशांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड सतर्क राहणं गरजेचं आहे,' असंही मंगेशकर कुटुंबियांनी परिपत्रकात म्हटलं आहे. (हेही वाचा -Sushant Singh Rajput Death: सुशांंत सिंह राजपूत ने स्वतः एका मुलाखतीत Claustrophobia असल्याची दिली होती कबुली, पहा हा Viral Video)

दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आलेख वाढचं आहे. राज्यात शनिवारी 16,867 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच 11,541 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात सध्या एकूण 1,85,131 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.58% झाले आहे.