Kunal Khemu ने केला मुलगी 'इनाया नौमी खेमू' च्या नावाचा टॅटू (See Pic)

इनायाच्या वाढदिवसानिमित्त त्याने तिच्या नावाचा टॅटू करुन घेतला आहे.

Inaaya & Kunal Khemu (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू (Kunal Khemu) याने मुलगी इनाया नौमी खेमू (Inaaya Naumi Kemmu) हिच्या वाढदिवसानिमित्त तिला खास गिफ्ट दिले आहे. 29 सप्टेंबर रोजी इनायाचा तिसरा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने कुणालने तिच्या नावाचा टॅटू करुन घेतला आहे. कुणाल खेमू सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून तो नेहमीच आपल्या मुलीचे खास क्षण चाहत्यांसह शेअर करत असतो. आता इनायाच्या वाढदिवसानिमित्त त्याने देवगिरी स्टाईलमध्ये तिचे नाव गोंदवून घेतले आहे. याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.

कुणाल खेमू याने इंस्टाग्राम अकाऊंटवर टॅटूचा फोटो शेअर करत मुलीसाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. कुणालने पोस्टमध्ये लिहिले, "या टॅटूची शाई माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ आहे. माझी छोटीशी मुलगी कायम माझ्या हृदयाचा एक हिस्सा असेल. तिचे नाव आहे इनाया आणि तिचे मधले नाव नौमी. याचा अर्थ दुर्गा. तिचे रुप लाल कुंकवाने आणि त्रिशूळाने दाखवण्यात आले आहे." कुणालच्या या फोटोवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रीया येत आहेत. (सोहा अली खान ची मुलगी इनाया आपले वडिल कुणाल खेमू च्या वाढदिवसामिनित्त गायले गाणे, पाहा क्युट व्हिडिओ)

पहा फोटो:

 

View this post on Instagram

 

This ink is the closest to my heart emotionally and literally as well. My little girl is and will always be a part of me. Her name inaaya (इनाया) is at the centre in Devanagari and her middle name Naumi (नौमी) meaning Goddess Durga is represented by the Red Bindi (artistic) in the middle and the Trishul at both ends.. Thank you @ironbuzztattoos #pramod for doing this at such short notice and so well. I love it 😊

A post shared by Kunal Kemmu (@khemster2) on

तैमुर अली खान प्रमाणे इनाया देखील सोशल मीडियावर हिट आहे. तैमुर-इनायाचे अनेक व्हिडिओज समोर आले आहेत. गायत्री मंत्र पठणाचा इनायाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. दरम्यान, डॉटर्स डे निमित्त कुणाल खेमूने इनायाचा गोंडस फोटो शेअर करत तिच्यासाठी प्रेमपूर्वक संदेश लिहिला होता.