कृति सेनन हिची आमिर खान सोबत केली तुलना, अभिनेत्री अशा प्रकारे केले रिअॅक्ट

तिने मिमी मध्ये केलेल्या शानदार भुमिकेमुळे सर्वांचे मन जिंकले. खासकरुन या सिनेमासाठी तिने 15 किलो वजन सुद्धा वाढवले होते.

कृति सेनन (Image Credit: Instagram)

बॉलिवूड मधील अभिनेत्री कृति सेनन (Kriti Senon) सध्या प्रत्येक निर्मात्यांची पसंद आहे. तिने मिमी (Mimi)  मध्ये केलेल्या शानदार भुमिकेमुळे सर्वांचे मन जिंकले. खासकरुन या सिनेमासाठी तिने 15 किलो वजन सुद्धा वाढवले होते. परंतु नुकतेच तिला आमिर खान याचे फिमेल वर्जन असल्याचे म्हटले गेले. त्यावरुनच आता कृति सेनन हिने रिअॅक्ट केले आहे. तिने असे म्हटले की, तिची आमिर सोबत केलेल्या तुलनेमुळे तिला त्रास होते.(Gadar 2: तारासिंह आणि सकिना येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! ‘गदर २’च्या शूटिंगला सुरुवात, अमिषा पटेलकडून चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर)

नुकत्याच एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत कृति सेनन हिला फिमेल आमिर खान म्हटले जाऊ शकते असे म्हटले. यावर अभिनेत्रीने उत्तर दिले की, यामुळे तिला त्रास होते. त्याचसोबत आमिर सोबत तुलना करण्यापूर्वी तिला अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. कृतिने या बद्दल सांगताना म्हटले की, जर एखादा व्यक्ती आपल्या भुमिकेची तारीफ करतो ज्यासाठी तुम्ही खुप कष्ट घेतलेले असतात तेव्हा त्यासाठी वेगळीच संतुष्टता मिळते.

दरम्यान, कृति हिने मिमी सिनेमात पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर यांच्यासोबत दिसून आली होती. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा प्रसिद्ध झाला होता आणि त्याला खुप पसंद करण्यात आला.(Shabaash Mithu: मिताली राजच्या वाढदिवसाचं निमित्त साधत ‘शाबास मिठू’ चित्रपटांच नवीन पोस्टर रिलीज, 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला)

दुसऱ्या बाजूला कृति हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती कार्तिक आर्यन सोबत शहजादा शूटिंग मध्ये व्यस्त आहे. या व्यतिरिक्त ती आदिपुरुष, भेडिया आणि गणपत मध्ये सुद्धा झळकणार आहे. कृति हिचे काही सिनेमे पुढील वर्षात प्रदर्शित होणार आहेत.