KL Rahul Wedding Gift: केएल राहुलला लग्नात मिळाले करोडोंचे गिफ्ट; विराट कोहलीने BMW तर धोनीने दिली बाईक; काय आहे किंमत जाणून घ्या
यातील महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni), विराट कोहली (Virat Kohli) आणि सलमान खान (Salman Khan) यांनी राहुलला दिलेल्या भेटवस्तू सर्वात महाग आहेत.
KL Rahul Wedding Gift: भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) ने 23 जानेवारी रोजी गर्लफ्रेंड अथिया शेट्टी (Athiya Shetty) सोबत लग्न केले. दोघेही बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते आणि आता त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. या निमित्ताने क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील बड्या व्यक्तींनी राहुलला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. यातील महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni), विराट कोहली (Virat Kohli) आणि सलमान खान (Salman Khan) यांनी राहुलला दिलेल्या भेटवस्तू सर्वात महाग आहेत. राहुल किंवा त्याला गिफ्ट देणाऱ्या व्यक्तीने याबाबत माहिती दिली नसली तरी राहुलला करोडोंच्या भेटवस्तू मिळाल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
एका अहवालानुसार, भारताच्या दोन माजी कर्णधारांनी राहुलसाठी दोन अप्रतिम भेटवस्तूंवर 3.50 कोटी रुपये खर्च केले. धोनी, ज्याच्या नेतृत्वाखाली राहुलने भारतासाठी एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळले. त्याने त्यांला 80 लाख रुपयांची कावासाकी निन्जा बाईक भेट दिली, तर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी केएल आणि अथिया यांना 2.70 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कार भेट दिली. (हेही वाचा -KL Rahul-Athiya Shetty Wedding Photos: अथिया-केएल राहुलचा लग्नसोहळा संपन्न; पहा नवविवाहित जोडप्याचे फोटोज)
धोनीने राहुलला दिलेल्या बाईकच्या मॉडेलची नेमकी माहिती नाही. असं म्हटलं जात की, धोनी स्वतः बाईक प्रेमी आहे. त्याने राहुलला Ninja H2R बाईक भेट दिली आहे. ज्याची भारतातील शोरूम किंमत ₹ 79,90,000 आहे. धोनी आणि कोहली स्वतः लग्नाला उपस्थित राहू शकले नसले तरी, त्यांच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. राहुल आणि अथियाचे खंडाळ्यात एका खाजगी समारंभात लग्न झाले. चित्रपट उद्योग आणि भारतीय क्रिकेट या दोन्ही क्षेत्रातील अनेक लोकप्रिय व्यक्तींना लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले होते. अनेकजण त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.
धोनी सध्या आयपीएल 2023 ची तयारी करत आहे. ज्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, कोहली लग्नाला उपस्थित राहू शकला नाही. कारण तो भारत आणि न्यूझीलंडमधील एकदिवसीय मालिकेचा भाग होता. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंनाही आमंत्रित करण्यात आले होते, पण कोहलीप्रमाणे हे दोघेही भारतीय संघाचा भाग होते.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सामन्यांसाठी राहुलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येही तो टीम इंडियाचा भाग नाही. मात्र, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत राहुल टीम इंडियात पुनरागमन करू शकतो.
अभिनेता सुनील शेट्टी आणि पत्नी माना यांनी राहुल-अथियाला मुंबईत 50 कोटी रुपयांची आलिशान अपार्टमेंट भेट दिली आहे. अभिनेता सलमान खानने त्याला 1.6 कोटींची ऑडी कार दिली आहे. जॅकी श्रॉफने अथियासाठी 30 लाख रुपये तर अर्जुन कपूरने 1.5 कोटी रुपयांचे घड्याळ आणि ब्रेसलेट गिफ्ट केले आहे.