डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी Kiara Advani पुन्हा झाली Topless , पाहा फोटो
कियारा आडवाणी (Photo Credits: Yogen Shah)

Kiara Advani Topless Photo: कबीर सिंह चित्रपटातून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री कियारा अडवाणीची गणना बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिला तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठीही ओळखले जाते. याचपार्श्वभूमीवर कियारा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कियाराने डब्बू रत्नानीच्या 2021 कॅलेंडरसाठी पुन्हा एकदा टॉपलेस फोटो शूट केला आहे. नुकताच तिने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. कियाराचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांसह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. तसेच हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.

कियाराने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. या फोटोत कियारा टॉपलेस असल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये कियाराचा जबरदस्त बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. हा फोटो समुद्र किनाऱ्यावर काढण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कियाराने हा फोटो शेअर करत ‘#dabbooratnanicalendar2021’, असे कॅप्शन दिले आहे. डब्बू रत्नानीनेही कियाराचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे देखील वाचा- Samantar 2 Official Teaser: स्वप्नील जोशी, नितिश भारद्बाज, तेजस्विनी पंडित 'समांतर 2' मधून येणार रसिकांच्या भेटीला; इथे पहा टीझर

कियाराचा टॉपलेस फोटो-

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियाराने याआधीही डब्बू रत्नानी यांच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूटही केले होते, ज्यामध्ये ती एका मोठ्या पानाच्या मागे लपलेली दिसत होती. तिचा हा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवरून सोशल मीडियावर कियारा ट्रोल झाली होती.