War 2 Movie Leaked Video: कियारा अडवाणी आणि ह्रतिक रोशन यांचा आगामी चित्रपट वॉर २ मधील सीन लीक, सेटवरील व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचा अभिनेता ह्रतिक रोशन आणि कियारा अडवाणी हे दोघेही चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. वॉर २ या आगमी चित्रपटातच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे शुटिंग इटलीत सुरु आहे

War 2 Movie Leaked Video: कियारा अडवाणी आणि ह्रतिक रोशन यांचा आगामी चित्रपट वॉर २ मधील सीन लीक, सेटवरील व्हिडिओ व्हायरल
War 2 Movie PC X

 War 2 Movie Leaked Video: बॉलिवूडचा अभिनेता ह्रतिक रोशन आणि कियारा अडवाणी हे दोघेही 'वॉर 2'  (War 2) या आगमी चित्रपटातच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे शुटिंग इटलीत सुरु आहे.  चित्रपटाच्या गाण्याचा व्हिडिओ लीक झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान दोन्ही कलाकारचे सेटवरील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटात हृतिक रोशनसोबत दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआर देखील दिसणार आहे.  (हेही वाचा- 'नवरा माझा नवसाचा 2' ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद; वीकेंडला केली 7.84 कोटींची कमाई)

मिळालेल्या माहितीनुसार, वॉर २ सेटवरचा एक व्हिडिओ लीक झाला आहे. लीक झालेला हा व्हिडिओ चित्रपटातील रॉमॅंटिक गाण्याचा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ह्रतिक आणि कियारा दिसत आहे. लीक झालेल्या क्लिपमध्ये कियारा हृतिककडे धावत जाऊन त्याला मिठी मारत असल्याचे दाखवले आहे. रोमॅंटिक सीन शूट करण्यासाठी इटलीत च्या एका स्ट्रीटवर आहे. कियारा णि ह्रतिकच्या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. एकाने कंमेटमध्ये लिहले आहे की, ह्रतिक रोशन आणि कियार अडवाणी एकत्र सुंदर दिसत आहे.

  War 2 लीक व्हिडिओ

वॉर चित्रपटासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. चित्रपट अॅक्शन जोनरवर असणार आहे. वॉर 2 चित्रपट पुढच्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2019 च्या अॅक्शन थ्रिलर चित्रपट वॉरचा सिक्वेल असणार आहे. वॉर चित्रपटात ह्रतिक, टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत होते. इटलीतील शूटिंग संपल्यानंतर पुढच्या महिन्यात दोन्ही कलाकार मुंबईत दाखल होणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2024 12:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).