KBC 13: Suniel Shetty ने शेअर केला Amitabh Bachchan यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा (Watch Video)
शुक्रवारी प्रसारीत झालेल्या या एपिसोडमध्ये दोघांनीही जोरदार मज्जा मस्ती केली.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या लोकप्रिय टीव्ही शो (TV Show) कौन बनेगा करोड़पति 13 (Kaun Banega Crorepati 13) च्या मंचावर यावेळेस सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी हजेरी लावली होती. शुक्रवारी प्रसारीत झालेल्या या एपिसोडमध्ये दोघांनीही जोरदार मज्जा मस्ती केली. दोघांनीही अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या काही खास आठवणी शेअर केल्या. सुनील शेट्टीने तर अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला आहे.
सुनील शेट्टी सांगतो की, "अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिली भेट डॉनच्या सेटवर झाली होती. तेव्हा मी खूप तरुण होतो. माझ्यासोबत इतरही काही मुलं होती. त्यावेळी क्रु त्यांना अमिताभ बच्चन यांना भेटू देत नव्हता. मात्र खुद्द बीग बिंनी या मुलांना अडवू नका असे सांगितले आणि त्यानंतर सुनील शेट्टीसह असलेल्या 8-10 तरुणांनी बिग बींची भेट घेतली. त्यावेळेस अमिताभ बच्चन यांनी एक नंबरही सुनील शेट्टी यांना दिला." यावर अमिताभ विचारतात, "मग तुम्ही कधी मला फोन नाही केला?" त्यावर सुनिल शेट्टी उत्तरतो, "खुद्द देवाशी कोणी कसं बोलू शकतं." त्यावर अमिताभ लगेचच त्याला थांबवत म्हणतात, "असं बोलत नाहीत." (KBC 13: गोलकीपर PR Sreejesh समोर अमिताभ बच्चन यांचा हॉकीचा खेळ; पहा मजेशीर व्हिडिओ)
पहा व्हिडिओ:
यावर अमिताभ बच्चन देखील चाहत्यासोबतचा एक किस्सा शेअर करताना दिसत आहेत. बिग बी सांगतात, एका चाहत्याने एक नंबर देऊन त्यांना फोन करण्याची विनंती केली होती आणि जेव्हा चाहत्याची चौकशी करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी त्याला फोन केला तेव्हा समोरुन उत्तर आले, चल रे खेचू नको. अमिताभ यांच्या या किस्स्यावर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकतो. दरम्यान, जॅकी श्रॉफ यांनी देखील बिग बीं सोबतचा एक खास किस्सा शेअर केला आहे.