Time To Dance Trailer: कैटरीना कैफची बहीण Isabelle Kaif चा डेब्यू चित्रपट 'टाइम टू डान्स'चा ट्रेलर रिलीज; पहा व्हिडिओ

या चित्रपटाचे दिग्दर्शन स्टॅनले मेनिनो डी कोस्टा करत आहेत. हा चित्रपट 12 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Time To Dance Trailer (PC - You Tube)

Time To Dance Trailer: कैटरिना कैफची बहीण इजाबेल कैफ (Isabelle Kaif) चा डेब्यू चित्रपट 'टाइम टू डान्स' (Time To Dance) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा एक नृत्यावर आधारित चित्रपट आहे. ज्यामध्ये अभिनेता सूरज पंचोली (Sooraj Pancholi) इजाबेलसोबत दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

या चित्रपटाची कथा नृत्य स्पर्धेवर आधारित आहे. आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये असे नृत्य चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. नृत्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी परदेशात गेलेल्या सूरज पंचोलीची भेट इजाबेल कैफशी होते. त्यानंतर, स्पर्धेचा टप्पा सुरू होतो. या स्पर्धेत हे जोडपे लॅटिन आणि बॉलरूमसारखे नृत्य प्रकार सादर करताना दिसतील. (वाचा - Mumbai Saga Teaser: जॉन अब्राहम याचा आगामी चित्रपट 'मुंबई सागा' चा धमाकेदार टीजर झाला प्रदर्शित, Watch Video)

या चित्रपटाचे दिग्दर्शन स्टॅनले मेनिनो डी कोस्टा करत आहेत. ते या चित्रपटाद्वारे डेब्यू करत आहे. तसेच कोरियोग्राफर रेमो डिसूजाची पत्नी लिझेल या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2018 मध्येचं पूर्ण झाले आहे. कैटरिनाची बहीण इजाबेल गेल्या काही काळापासून या चित्रपटाची तयारी करत होती. हा चित्रपट 12 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, इजाबेल आणखी दोन चित्रपटात दिसणार आहे. सुस्वागतम खुशामदीद या चित्रपटात इजाबेल पुलकित सम्राट सारख्या कलाकारांसोबत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी हे दोन्ही स्टार शूटिंग करताना दिसले होते. याशिवाय इजाबेल सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मासोबत दिसणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now