Kareena Kapoor Baby Bump Photos: करिना कपूर हिचे बेबी बंप सह शूटिंग; बहीण करिश्मा कपूर ने शेअर केले हे क्यूट फोटोज
Kareena Kapoor Baby Bump Photos: अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्या घरी लवकरच एका लहान पाहुण्याचे स्वागत होणार आहे. तर तैमूर नंतर आता पुन्हा एकदा करिना कपूर (Kareena Kapoor) प्रेग्नंट आहे. तर काही दिवसांपूर्वीच करिना हिने बेबी बंप फ्लॉन्ट (Baby Bump Flaunt) करतानाचे फोटो सुद्धा शेअर केले आहेत. तर करिना कपूर हिच्याकडे गोड बातमी असल्याचे कळल्यानंतर सोशल मीडियातून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर आनंदाचा वर्षाव केला. तसेच आपल्या प्रतिक्रिया देत येणाऱ्या नव्या चिमुकल्यासाठी शुभेच्छा ही दिल्या. त्यानंतर आता करिना कपूर ही बहीण करिश्मा सोबत शूटिंगच्या सेटवर पोहचली आहे. याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.(Saif Ali Khan Turns 50: करीना कपूर हिने हटके स्टाईलमध्ये दिल्या सैल अली खान याला 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! Watch Video)
तर करिना कपूर आणि करिश्मा कपूर या दोघींनी एकाच रंगाचे कपडे परिधान केल्याचे दिसून येत आहे. मात्र करिना आणि करिश्मा नक्की कशासाठी शूट करत आहेत ते कळू शकलेले नाही. करिना बेबी फ्लॉन्ट करताना अतिशय सुंदर दिसून येत आहे. तिची स्माईल पाहिली तर तुमच्या चेहऱ्यावर ही हास्य उमटेल. (सैफ अली खानच्या पावलावर पाऊल टाकत 'तैमुर' चं ही वॉल पेंटिंग; पहा करिनाच्या Inhouse Picasso ची कलाकृती!)
करिश्मा कपूर हिने सुद्धा तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात करिना कपूर ही मेकअप करताना दिसून येत असून करिश्मा ही तिचे हावभाव कॅमेऱ्यात कैद करत आहे. या व्हिडिओला करिश्मा हिने Working with the sis always the best ❤️ असे कॅप्शन ही दिले आहे.
View this post on Instagram
Working with the sis always the best ❤️ #sistersquad 👭 #behindthescenes
A post shared by KK (@therealkarismakapoor) on
तर याआधी करिना हिने तैमूर सोबत बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर केले होते. त्यात टिम सुद्धा अतिशय क्युट दिसून येत आहे. शेअर केलेल्या फोटोला करिना हिने Excuse us... Got to go cheer for our favourite team असे कॅप्शन दिले होते. तसेच सैफ याच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा एका बुमरॅंन्ग व्हिडिओतून ही करिना बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती.