The Kashmir File: कपिल शर्माने 'द काश्मीर फाइल्स'चे प्रमोशन करण्यास नकार दिला? अनुपम खेर यांनी 'या' वादावर दिली प्रतिक्रिया

'द कश्मीर फाइल्स'चे स्टार अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत या संपूर्ण वादाचा पर्दाफाश केला असून 'द कपिल शर्मा शो'मध्ये चित्रपटाचे प्रमोशन न करण्यामागचे कारण उघड केले आहे.

Anupam kher & Kapil Sharma (Photo Credit - FB)

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir File) हा चित्रपट' चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला समीक्षकांपासून ते प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. 'द काश्मीर फाइल्स'मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनाचा गंभीर मुद्दा मांडण्यात आला आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या शोमुळेही हा चित्रपट चर्चेत होता. वास्तविक, 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नुकतेच कपिल शर्माबद्दल सांगितले की, त्याला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आमंत्रित करण्यात आले नव्हते. यानंतर कपिल शर्मा ट्रोलच्या निशाण्यावर आला. कपिल शर्माला ट्विटरवर ट्रोल केले जाऊ लागले आणि 'द कपिल शर्मा शो'वर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू झाली.

अशा परिस्थितीत आता अनुपम खेर यांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले असून यामागचे सत्य सर्वांना सांगितले आहे. 'द कश्मीर फाइल्स'चे स्टार अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत या संपूर्ण वादाचा पर्दाफाश केला असून 'द कपिल शर्मा शो'मध्ये चित्रपटाचे प्रमोशन न करण्यामागचे कारण उघड केले आहे.

दोन महिन्यांपूर्वीच मिळाले होते आमंत्रण

अनुपम खेर यांनी सांगितले की, 'द कश्मीर फाइल्स'च्या प्रमोशनसाठी त्यांना कपिल शर्मा शोमधून दोन महिन्यांपूर्वीच आमंत्रण मिळाले होते. पण, हा चित्रपट एवढ्या गंभीर विषयावर बनवला आहे की, कॉमेडी शोमध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करणं त्यांना योग्य वाटलं नाही. हा व्हिडिओ शेअर करताना कपिल शर्माने अनुपम खेर यांचे आभार मानले आहेत.

Tweet

अनुपम खेर एका मुलाखतीत म्हणाले- 'मला शोसाठी बोलावले होते, त्यानंतर मी माझ्या मॅनेजरला सांगितले की यार हा चित्रपट खूप गंभीर विषयावर आहे, मी तिथे माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करू शकत नाही.' ते पुढे म्हणतात- 'मला माझे म्हणणे मांडायचे आहे. तिथुन मला 2 महिन्यांपूर्वी फोन आला होता. मी त्या शोमध्ये 2-4 वेळा गेलो आहे आणि तो एक मजेदार शो आहे आणि एक मजेदार शो करणे खूप कठीण आहे. (हे ही वाचा Brahmastra Alia Bhatt First Look: आलिया भट्टने तिच्या वाढदिवशी 'ब्रह्मास्त्र'चा टीझर शेअर करुन चाहत्यांना दिली खास भेट)

कपिल शर्मा याआधीही अनेकदा वादात सापडला आहे

मात्र, कपिल शर्माचे नाव वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. कपिल शर्मा याआधीही अनेकदा वादात सापडला आहे. कधी त्याच्या टीमसोबतच्या वादामुळे तर कधी इतर कारणांमुळे कपिल शर्मा चर्चेत आला आहे. दुसरीकडे 'द काश्मीर फाइल्स' बद्दल बोलायचे तर हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायावर आधारित आहे. ज्यामध्ये अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif