कन्नड अभिनेत्री Jayashree Ramaiah ची आत्महत्या; गेल्या कित्येक दिवसांपासून होती नैराश्यात
रिपोर्ट्सनुसार, जयश्री रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर फारच दु: खी होती. काम न मिळाल्याबद्दल तिने आपल्या मित्रांनाही सांगितले होते.
कन्नड अभिनेत्री जयश्री रमैया (Jayashree Ramaiah) सोमवारी बेंगळुरूच्या वृद्धाश्रम आणि पुनर्वसन केंद्रात मृत अवस्थेत आढळली. तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. असं म्हटलं जात आहे की, रमैया बऱ्याच दिवसांपासून नैराश्याने ग्रस्त होती आणि तिचा उपचार बंगळुरूच्या संध्या किरण आश्रमात सुरू होता. जयश्रीच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
जयश्रीने बिग बॉस कन्नडच्या सीझन 3 मध्ये भाग घेतला होता. रिपोर्ट्सनुसार, जयश्री रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर फारच दु: खी होती. काम न मिळाल्याबद्दल तिने आपल्या मित्रांनाही सांगितले होते. गेल्या वर्षी जयश्री रमैयाने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तिच्या नैराश्याविषयी माहिती दिली होती. यात ती म्हणाली होती की, मी डिप्रेशनविरोधात लढू शकत नाही. त्यामुळे मला इच्छा मरण हवं आहे. ती आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे. परंतु, लहानपणापासूनचं धोका मिळाल्याने मी डिप्रेशनमध्ये आले आहे. (वाचा - ‘ए मेरे वतन के लोगों’ गाण्यासंदर्भात चुकीची माहिती दिल्याने Vishal Dadlani झाले ट्रोल; सोशल मीडियावर मागितली माफी)
जयश्रीने पुढे खुलासा केला की, तिला स्वत: ला हरवल्यासारखी जाणीव होत आहे. मी प्रसिद्धीसाठी हे सर्व करत नाही. मला सुदीप सरांकडूनही आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. मी फक्त माझ्या मृत्यूची अपेक्षा करत आहे. कारण मी नैराश्याशी लढण्यास असमर्थ आहे. जयश्रीने आपल्या लाइव्ह सत्राच्या शेवटी सांगितलं होतं की, मी एक हारलेली महिला आहे, जिचा मृत्यू होणे आवश्यक आहे. मी चांगली मुलगी नाही. कृपया, मला इच्छा मृत्यु द्या.