Kangana Ranaut Voted For Shiv Sena? इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगना रनौतची माहिती, केले होते शिवसेनेला मतदान; जाणून घ्या या दाव्यामागील सत्यता

कंगनाने मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी तिच्यावर कडाडून टीका केली होती.

Kangana Ranaut, CM Uddhav Thackeray (PC - Facebook)

सध्या अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) व महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) यांच्यामधील वाद शिगेला पोहोचला आहे. कंगनाने मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी तिच्यावर कडाडून टीका केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ट्वीटच्या माध्यमातून कंगना महाराष्ट्र सरकारवर हल्ला करीत आहे. आता याच अनुषंगाने नुकत्याच एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितले आहे की, तिने शिवसेनेला (Shiv Sena) मतदान केले आहे. कंगनाने असेही म्हटले आहे की, तिला भाजपला (BJP) मतदान करायचे होते, मात्र युती असल्याने तिला शिवसेनेला मतदान करावे लागले. मात्र कंगनाने केलेला दावा खरा आहे? चला पाहूया काय आहे तथ्य.

कंगना रनौतचे मतदान हे वांद्रे पश्चिम या मतदारसंघामध्ये आहे. जर का आपण असे मानले की, कंगनाने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान केले होते, तर या मतदारसंघामध्ये 2019 मध्ये भाजपचे उमेदवार होते आशिष शेलार. भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक एकत्रित लढवली होती व आशिष शेलार हे युतीचे उमेदवार होते. त्यामुळे इथे दुसरा शिवसेनेचा उमेदवार असल्याचा प्रश्नच नाही.

आता कंगना रनौतने लोकसभा 2019 मध्ये शिवसेनेला मतदान केले असे मानूया. तर वांद्रे पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात येतो. हा मतदारसंघही युतीमध्ये भाजपकडे होता. 2019 मध्ये इथून भाजपच्या पूनम महाजन या उमेदवार होत्या. त्यामुळे लोकसभेतही या ठिकाणी शिवसेनचा उमेदवार नव्हता.

जर का कंगना 2017 च्या बीएमसी निवडणुकांबाबत बोलत आहे असे मानले तर, या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना दोघे वेगवेगळे लढले होते. त्यामुळे इथे चीत्याकडे भाजपला मतदान करण्याचा पर्याय होता.

कदाचित ती 2014 च्या निवडणुकांबाबत बोलत आहे असे मानले तर, 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजप आणि शिवसेना एकत्र लढले होते. या ठिकाणी युतीच्या उमेदवार म्हणून भाजपच्या पूनम महाजन होत्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यामुळे, जवळजवळ प्रत्येक ठिकाणी दोघांनी आपापले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे इथेही भाजपला डावलून शिवसेनेला मतदान केले, हा दावा फोल ठरतो. (हेही वाचा: कंगना च्या Soft Pornstar कमेंटवर उर्मिला मातोंडकर यांना आधार देत प्रिया दत्त यांनी ट्विट केलं 'हे' गाणंं)

2009 च्या निवडणुकांमध्येही विधानसभा व लोकसभेसाठी इथे भाजपचाच उमेदवार उभा होता. अशाप्रकारे 2019, 2014 व 2009 च्या निवडणुका पहिल्या तर, भाजपला डावलून शिवसेनाला मतदान केले, हा कंगनाने केलेला दावा फोल ठरतो.