Kangana Ranaut Tweets to PMO: वाजिद खान यांच्या पत्नीच्या समर्थनात उतरली कंगनी रनौत, धर्म परिवर्तनाच्या मुद्द्यावरुन केले पीएम कार्यालयाला ट्वीट

कमलरुख खान, कंगना रनौत आणि पीएम मोदी (Photo Credits: Instagram)

Kangana Ranaut Tweets to PMO: बॉलिवूड मधील अभिनेत्री कंगना रनौत हिने वाजिद खान यांची पत्नी कमलरुख खान यांचे समर्थन केले आहे. त्यानुसार कंगना हिने एका ट्वीटमध्ये पीएम कार्यालयाला टॅग करुन धर्म परिवर्तनाचा मुद्दा उचलून धरला आहे. दिवंगत म्युजिक कंम्पोजर वाजिद खान यांच्या पत्नी कमलरुख यांना लग्नानंतर सासरच्या लोकांनी धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडण्यास लावले असे म्हटले आहे. त्यामुळेच या दोघांच्या नात्यात दूरावा ही आल्याचे त्यांनी सांगितले.(मुंबई महापौरांच्या 'त्या' विधानावर कंगना रनौत हिचे प्रत्युत्तर; आदित्य पंचोली आणि ऋतिक रोशन च्या नावाचाही उल्लेख)

या गोष्टीवरुन आता कंगनी हिने कमलरुख यांचे समर्थन करत एक ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये म्हटले आहे की, पारसी हेच या देशाचे खरे अल्पसंख्यांक आहेत. ते खुसखोरांसारखे आलेले नाहीत आणि त्यांनी कधीच शरणागती पत्करुन भारत मातेच्या प्रेमाची मागणी केली होती. त्यांचा समाज हे देशाचे सौंदर्य आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.(Kangana Ranaut Property Demolition Case: कंगना रनौत हिच्या प्रॉपर्टीवरील तोडक कारवाई बेकायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा BMC ला झटका)

कमलरुख हिच्याबद्दल बोलत कंगनाने पुढे म्हटले की, ती माझ्या मित्राची विधवा आहे. एक पारसी महिला तिला धर्म परिवर्तन करण्यास त्रास दिला जात आहे. मी पंतप्रधान कार्यालयाला विचारते की, तुम्ही दंगल आणि जबरदस्तीने धर्म परिवर्तन करुन सहानुभूती मिळवण्यासाठी नाटक करु नका. पारसी लोकांची संख्या वेगाने कमी होत आहे.

कंगनाने ट्वीट मध्ये असे ही म्हटले की, हा भारत अशा मातेला झळकवतो जेथे अधिक ड्रामा करणाऱ्यांचा जास्तचा फायदा होता आणि लक्ष ही आकर्षित होते. मात्र जे खरेच योग्य, संवेदनशील आणि काळजी घेतो त्याला आजी बनवले जाते. आपल्याला यावर विचार करणे गरजेचे आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif