कंगना रनौतने महत्वाकांक्षी चित्रपट Thalaivi चित्रपटाचे हक्क विकले Netflix आणि Amazon Prime ला; 55 कोटींमध्ये पार पडला व्यवहार

यामुळे अनेक चित्रपटांचे शूटिंग आणि रिलीजच्या तारखा रद्द केल्या जात आहेत किंवा पुढे ढकलल्या जात आहेत. याचा पुढचा टप्पा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) अनेक चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी निर्मात्यांनी दाखवली आहे.

Kangana Ranaut And Jayalalithaa (Photo Credits: Instagram/PTI)

लॉक डाऊनमुळे सध्या भारतातील चित्रपटसृष्टीचे कामकाज काही काळ बंद झाले होते. यामुळे अनेक चित्रपटांचे शूटिंग आणि रिलीजच्या तारखा रद्द केल्या जात आहेत किंवा पुढे ढकलल्या जात आहेत. याचा पुढचा टप्पा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) अनेक चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी निर्मात्यांनी दाखवली आहे. दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) ओटीटी व्यासपीठ Amazon आणि नेटफ्लिक्सला (Netflix) तिचा बहुचर्चित चित्रपट 'थलायवी'चे (Thalaivi) हक्क विकले आहे. हे हक्क तब्बल 55 कोटींना विकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कंगनाने ही गोष्ट उघड केली आहे.

मात्र त्याचबरोबर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत नसल्याचेही तिने सांगितले आहे. कंगना पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, 'थलायवी' हा चित्रपट फार मोठ्या स्केलचा चित्रपट आहे, त्यामुळे तो डिजिटल स्तरावर प्रदर्शित होऊ शकत नाही. तसेच 'मणिकर्णिका' हा देखील डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित होऊ शकत नाही. पण 'पंगा' आणि 'जजमेंटल है क्या' यांसारखे चित्रपट डिजिटल फ्रेंडली आहेत, जे डिजिटल माध्यमांवर लोकांना दाखवले गेले व ते लोकांना आवडलेही. या चित्रपटांनी डिजिटल माध्यमातूनही चांगली कमाई केली.’ (हेही वाचा: बॉलिवूड दिवगंत अभिनेता इरफान खान ची पत्नी सुतापा ने इरफान ने लावलेल्या झाडांचा फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा)

थलायवी हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता  (Jayalalithaa) यांचा चरित्रपट आहे, जो हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल. हा दिग्दर्शित ए.एल विजय दिग्दर्शित करीत आहेत, तर विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर. हे निर्माते आहेत. यामध्ये जयललिता यांचा चित्रपटसृष्टीपासून राजकारणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे.

दरम्यान सध्याच्या परिस्थितीमध्ये या चित्रपटाच्या शुटींगसाठी काही समस्या उभ्या राहिल्या आहेत. या चित्रपटाच्या शुटींगच्या उर्वरित भागांमध्ये क्लायमॅक्स सीन देखील आहे. या सीनसाठी सेटवर सुमारे 350 लोकांना एकत्र आणावे लागेल. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, असे करणे हे सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या विरोधात ठरेल. म्हणूनच सध्या तरी या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार नसल्याचे कळत आहे.