Kangana Ranaut Slams Anurag Kashyap: अनुराग कश्यप ने कंंगनाला दिला चीन शी लढण्याचा सल्ला, कंंगनाने त्याचीच अक्कल काढत दिले 'हे' उत्तर
आज सुद्धा कंंगनाच्या एका ट्विट वरुन अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) तिला चीन शी लढण्याचा सल्ला वजा टोमणा मारला होता, ज्यावर उत्तर देताना कंंगनाने पार अनुराग ला मंंदबुद्धी म्हणत पलटवार केला आहे.काय आहे कंंगना विरुद्ध अनुराग असं ट्विट वॉर इथे पाहा.
कंगना विरुद्ध बॉलिवूड (Kangana Vs Bollywood) हा वाद तसा जुनाच आहे, पण अलिकडे कंंगनाने अगदीच बोल्डपणे बोलायला किंबहुना टीका करायला सुरुवात केल्यापासुन तिच्या समर्थनात असलेले कलाकार सुद्धा विरोधक झाले आहेत. यामुळेच अलिकडे रोज कंंगना विरुद्ध एक कोणताही कलाकार असं वॉर सुरु होतंं अर्थात त्यांंची रणभुमी असते सोशल मीडिया. आज सुद्धा कंंगनाच्या एका ट्विट वरुन अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) तिला चीन शी लढण्याचा सल्ला वजा टोमणा मारला होता, ज्यावर उत्तर देताना कंंगनाने पार अनुराग ला मंंदबुद्धी म्हणत पलटवार केला आहे.काय आहे कंंगना विरुद्ध अनुराग असं ट्विट वॉर इथे पाहा. Urmila Matondkar vs Kangana: कंगना च्या Soft Pornstar कमेंटवर उर्मिला मातोंडकर यांना आधार देत प्रिया दत्त यांनी ट्विट केलं 'हे' गाणंं
कंंगनाने आज पहिल्या ट्विट मध्ये म्हंंटलंं होतं की," मी एक क्षत्रिय आहे,माझं शीर कापलं तरी झुकु देणार नाही आणि राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आपला आवाज बुलंद असेल. मान, सन्मान आणि स्वाभिमानासोबत मी जगतेय आणि नेहमीच जगत राहीन, मी स्वतः माझ्या तत्त्वांसोबत तडजोड करत नाही कोणाला करुही देणार नाही." याच ट्विट वर उत्तर देत अनुराग ने कंंगनाला, "तु एकटीच आहेस! मणिकर्णिका! तु एक काम कर चार पाच जणांंना घेऊन चीन वर हल्ला कर आणि त्यांंना दाखवुन दे तु आहेस तोवर देशाचं कोणीकाही वाकडंं करु शकणार नाही, तसंही तुझ्या घरापासुन 1 दिवसाचं अंतर आहे त्यामुळे जा आणि दाखवुन दे शेरनी जा! जय हिंंद!" असे म्हंंटले आहे.
अनुराग कश्यप ट्विट
तर आता अनुराग च्या या ट्विट ला उत्तर देत कंंगनाने ठीक आहे मी बॉर्डर वर जाते आणि तुम्ही ऑल्म्पिक मध्ये जा कारण देशाला गोल्ड मेडल हवेच आहेत. ही कोणती B Grade मूव्ही नाहीये, जिथे कलाकार काहीही बनतात जरा उपमा दिलेले समजत जा, तुम्ही इतके मंंदबुद्धी कधी झालात जेव्हा आपण मित्र होतो तेव्हा तर हुशार होतात असं म्हंंटलंं आहे. Kangana Ranaut Voted For Shiv Sena?
कंंगना रनौत ट्विट
दरम्यान, सध्या कंंगना विरुद्ध उर्मिला मातोंंडकर हा वाद चर्चेत आहे. कंंगनाने उर्मिलाला सॉफ्ट पॉर्नस्टार म्हंंटल्याने अक्खं बॉलिवूड कंंगनाच्या विरोधात उभं राहिलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)