Anurag Kashyap-Taapsee Pannu यांच्या घरावरील आयटी छाप्यानंतर Kangana Ranaut चे ट्विट; केले 'हे' गंभीर आरोप
लिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्या घरावर आयकर विभागाने (Income Tax Department) छापे टाकल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ने देखील त्यांच्या टीका करण्याची संधी सोडलेली नाही.
Kangana Ranaut Slams Anurag Kashyap and Taapsee Pannu: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्या घरावर आयकर विभागाने (Income Tax Department) छापे टाकल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ने देखील त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. ट्विट करत कंगनाने त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तर 'चोर-चोर मौसरे भाई' म्हणत त्यांना टोला लगावला आहे.
कंगनाने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, "जे चोर आहेत ते फक्त चोर आहेत, ज्यांना मातृभूमी विकायची आहे आणि तिचे तुकडे करायचे आहेत. ते फक्त देशद्रोही आहेत आणि जे गद्दारांना आधार देतात ते देखील चोर आहेत… कारण चोर चोर मावस भावंड असतात, आणि चोरांना ज्यांची भीती वाटते ते साधारण मानव नसून नरेंद्र मोदी आहेत."
पुढील ट्विटमध्ये कंगनाने दोघांवरही गंभीर आरोप केले आहेत. "केवळ करचोरीच नाही तर काळ्या पैशांचाही व्यवहार झाला आहे. शाहीन बाग आणि प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचार भडकवण्यासाठी त्यांना पैसे मिळाले होते का? हा काळा पैसा कुठून कुठे पोहचवण्यात आला याचा कोणाकडेही हिशोब नाही," असे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Kangana Ranaut Tweet:
दरम्यान, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरावर छापे मारल्यानंतर आयटी विभागाने ऑफिशियल स्टेटमेंट जारी केले आहे. त्यात त्यांनी सुमारे 350 कोटींचा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांचे ई-मेल, व्हॉट्सअॅप चॅट्स, हार्ड डिस्कची देखील तपासणी सुरु आहे. तपासादरम्यान सापडलेल्या 7 बँक लॉकर्सचीही तपासणी करण्यात येणार आहे.