Kangana Ranaut Backs Arnab Goswami: अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर कंगना रनौत चा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा; Watch Video

रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर संपूर्ण देशभरातून प्रतिक्रीया उमटत आहे. भाजप नेते यावर सडकून टीका करत असताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Kangana Ranaut, Arnab Goswami & Uddhav Thackeray (Photo Credits: Instagram)

रिपल्बिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अटकेनंतर संपूर्ण देशभरातून प्रतिक्रीया उमटत आहे. भाजप नेते यावर सडकून टीका करत असताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. सातत्याने महाराष्ट्र सरकारवर (Maharashtra Government) टीका करणाऱ्या कंगना रनौत हिने पुन्हा या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यासाठी तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचा पप्पुसेना, सोनिया सेना असा उल्लेख केला आहे.

या व्हिडिओत कंगना म्हणते की, "महाराष्ट्र सरकार तुम्ही अजून किती घर तोडणार? किती गळे दाबणार? किती तोंड बंद करणार? ही तोंड वाढतच जाणार. यापूर्वी अभिव्यक्ती स्वांतत्र्यासाठी अनेकांना फासावर लटवण्यात आले. अनेकांचे गळे कापण्यात आले.पण काही हरकत नाही. एक आवाज बंद केलात तर दुसरा उठेल. पण तुम्हाला राग का येतो? पेग्विंग बोलतो म्हणून तुम्ही तसे वाटता तर बोलणारच. पापा के पप्पु सारखे काम करता म्हणून पप्पूसेना म्हणतो. सोनियासेना म्हटल्यावर राग येतो का, मग आहात तुम्ही सोनिया सेना."

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut) on

आज सकाळी अर्नब गोस्वामी यांना मुंबईतील राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांना मला आणि कुटुंबियांना धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्नब गोस्वामी यांनी केला आहे. (सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक; अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांची ट्विटद्वारे टीका)

दरम्यान, यापूर्वी अनेकदा कंगना रनौत हिने महराष्ट्र सरकारवर टीका केली आहे, तिच्या वादग्रस्त पोस्टमुळे मुंबई पोलिसांनी तिला समन्स बजावला असून 10 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement