Kangana Ranaut: महिलेचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौतची टीका
तो पुन्हा आता उठणार नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना गमवावी लागली आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर सर्वच स्तरातून समिश्र प्रतिक्रिया पहायला मिळाल्या अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले तर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. अशातच अभिनेत्री कंगना रनौतने देखील उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
पहा ट्विट -
कंगना रनौतने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत हा निशाणा साधला आहे. आपल्या ट्विट मध्ये तिने लिहले आहे, "देवांचा राजा इंद्र सुद्धा दुष्कृत्ये करून स्वर्गातून पडतो, तर तो फक्त एक नेता आहे, जेव्हा त्याने माझे घर अन्यायाने तोडले तेव्हा मला समजले, तो लवकरच पडेल, देव चांगल्या कर्मांनी उठू शकतात परंतु जो महिलेचा अपमान करतो तो वाईट माणूस नाही… तो आता कधीच उठणार नाही.".
उद्धव ठाकरेंचं सरकार असताना कंगना रनौतने मुंबई आणि महाराष्ट्राच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्या नंतर राज्यात तिच्याबद्दल शिवसनेने आंदोलन केले होते आणि कंगना रनौतच्या घराचा काही अवैध्य भाग मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाणे पाडला होता.
केंद्रीय निवडणूक आयोगाने हंगामी आदेशामध्ये शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षनाव आणि ‘ढाल-तलवार’ या निवडणूक चिन्हाचे वाटप केले होते. मात्र, शुक्रवारी आयोगाने अंतिम निकाल देताना, शिंदे गटाचे हंगामी पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह तातडीने गोठवण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच शिवसेनेच्या २०१८च्या घटनेमध्ये, लोकप्रतिनिधी कायदा व पक्षांतर्गत लोकशाहीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार दुरुस्ती करावी, असाही आदेश आयोगाने दिला आहे.