Sachin Vaze Case: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ची शिवसेनेवर जोरदार टीका; ट्विट करत म्हणाली, योग्य पद्धतीने चौकशी केल्यास महाराष्ट्र सरकार कोसळेल

यावेळी तिने सचिन वाझे प्रकरणावरून महाराष्ट्र सरकार घेरले आहे.

Kangana Ranaut | (Photo Credits-Twitter Video)

Sachin Vaze Case: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त तिच्या सामाजिक विषयांवरील वक्तव्यामुळे जास्त चर्चेत असते. पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अटकेनंतर कंगना रनौत पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. कंगनाने आपल्या अधिकृत ट्विटरवरून शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीका केली आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर कंगनाने ट्विट करत या संपूर्ण घटनेसाठी शिवसेनाचं जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी एक मोठे षडयंत्र असल्याचंही कंगनाने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या कंगना रनौतचं हे ट्विट चर्चेचा विषय ठरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना रनौत महाराष्ट्रातील शिवसेना सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे. कंगना ठाकरे सरकारवर निशाणा साधण्याची कोणतीही संधी सोडत नाही. यावेळी तिने सचिन वाझे प्रकरणावरून महाराष्ट्र सरकार घेरले आहे. (वाचा - Ambani House Bomb Scare: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ पार्क करून इनोव्हाने पळ काढणाऱ्या संशयित आरोपीने वापरलेली कार मुंबई पोलिसांची, तपासात धक्कादायक खुलासा)

माझ्यावर 200 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतील -

कंगनाने एका वृत्तवाहिनीचे ट्विट रिट्विट करत लिहिलं की, 'या प्रकरणात एक मोठं कारस्थान रचण्यात आलं आहे. ज्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं. त्यांना शिवसेना सत्तेत आल्यानंतर परत आणण्यात आलं. सखोल तपासणीनंतर आणखी बरीच रहस्ये समोर येतील आणि यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पडेल. तसेच मला असंही वाटतयं की, माझ्यावर आणखी 200 एफआयआर दाखल होतील. जय हिंद.'

दरम्यान, देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार जप्त करण्यात आली होती. या कारचा मालकाचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत आढळून आला होता. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवास्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी शनिवारी राष्ट्रीय तपास एजन्सीने सचिन वाझे यांना अटक केली आहे. दरम्यान, आज त्यांना 25 मार्च पर्यंत NIA कोठडी ठोठावण्यात आली आहे.