Kangana Ranaut Brother Aksht's Wedding: भाऊ अक्षतच्या लग्नात कंगना रनौत हिचा पारंपारिक लूक पाहून चाहते झाले घायाळ, See Pics

कंगना च्या पारंपारिक वेषातील या फोटोजला 5 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यात तिने निळा आणि गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच केसात लाल रंगाचे फुल घातले आहे. तिचा हा अवतार चाहते प्रचंड पसंत करत आहे.

Kangana Ranaut Aksht's Wedding: (Photo Credits: Instagram)

आपल्या बेधडक आणि रोखठोक वक्तव्यामुळे बॉलिवूडसह संपूर्ण देशात खळबळ माजविणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या आपल्या भावाच्या अक्षतच्या (Aksht) लग्नात व्यस्त आहे. ती आपल्या कुटूंबासह हा लग्नसमारंभ छान एन्जॉय करत असून बिग फॅट लग्नामधील व्हिडिओज आणि फोटोज ती सोशल मिडियावर शेअर करत आहे. उदयपूर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यात आपल्या होणा-या वहिनीचे कंगना आणि रंगोलीने (Rangoli Chandel) दणक्यात स्वागत केले आहे. या दोघींचा लग्नातील डान्स देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. कंगनाने नुकताच तिचा लग्नातील फोटो शेअर केला आहे. यात पारंपारिक वेषातील तिचे सौंदर्य पाहून चाहते थक्क झाले आहेत.

कंगना च्या पारंपारिक वेषातील या फोटोजला 5 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यात तिने निळा आणि गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच केसात लाल रंगाचे फुल घातले आहे. तिचा हा अवतार चाहते प्रचंड पसंत करत आहे. हेदेखील वाचा- Kangana Ranaut's Tweet: कंगना रनौत हिची पुन्हा महाराष्ट्र सरकारवर टीका; आरे कारशेड सर्व मुंबईकरांची समस्या नसल्याचे केले ट्विट

 

View this post on Instagram

 

Kangana looking absolutely regal at her brother’s wedding. Custom outfit by #anuradhavakil with custom jewellery by @sabyasachiofficial . . . . HMU: @hairbyhaseena @loveleen_makeupandhair 📸: @ravindupatilphotography

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut) on

त्याचबरोबर तिने आपल्या भाऊ-वहिणीसोबत फोटो काढून 'ऋतू तुझे स्वागत असो' असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.

 

View this post on Instagram

 

#Kangana and family members for Ritu & Aksht’s big day. Don’t they just look happy and radiant? 😍🥰

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut) on

कंगनाने न केवळ बॉलिवूड तर अन्य क्षेत्रातील दर दिवसा घडणा-या घडामोडींवर भाष्य केले आहे. यासंबंधीचे व्हिडिओ अथवा ट्विट ते सतत पोस्ट करत असते.त्यामुळे अनेकदा वादाच्या भोव-यातही अडकली आहे. मात्र तरीही तिने सोशल मिडियावर पोस्ट करणे थांबवले नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now