Kalank Song Tabaah Ho Gaye: 'तबाह हो गए' गाण्यातील माधुरी दीक्षित हिचा बहारदार डान्स आणि दिलखेचक अदा प्रेक्षकांचे मन जिंकेल (Video)
पहा गाण्यातील माधुरी दीक्षित हिचा सदाबहार डान्स...
मल्टीस्टारर सिनेमा 'कलंक' (Kalank) मधील नवे गाणे 'तबाह हो गए' (Tabaah-Ho-Gaye) आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात आपल्याला माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिचा सदाबहार डान्स पाहायला मिळत आहे. यापूर्वी सिनेमाचा ट्रेलर आणि 3 गाणी प्रदर्शित झाली असून त्यामुळे प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. गाण्यात पारंपारीक वेशात माधुरी अतिशय मोहक दिसत असून तिच्या अदा प्रेक्षकांचे मन नक्कीच जिंकतील.
अमिताभ भट्टाचार्य यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या गाण्यावर श्रेया घोषाल हिने आपल्या सुमधूर आवाजाने साज चढवला आहे. तर प्रीतम याने गाणे संगीतबद्ध केले आहे. 'कलंक' चित्रपटामधील आलिया भट्ट आणि माधुरी दीक्षित यांचा अप्रतिम नृत्याविष्कार दाखवणारे 'घर मोरे परदेसीया' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
करण जोहर (Karan Johar) याने ट्विटरवर गाणे शेअर करत लिहिले की, "माधुरी दीक्षितची जादू आणि आणखी एक गाणे... 'तबाह हो गए' आऊट..."
करण जोहर ट्विट:
पहा गाण्याचा व्हिडिओ:
'कलंक' सिनेमात आलिया भट्ट (Alia Bhatt), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), संजय दत्त (Sanjay Dutt), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि वरुण धवन (Varun Dhawan) या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट स्टारर '2 स्टेट्स' सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक वर्मन यांनी 'कलंक' सिनेमा दिग्दर्शित केला असून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने निर्मितीची धूरा सांभाळली आहे. हा सिनेमा 17 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.