Kajal Aggarwal Blessed With Baby Boy: बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालने दिला गोंडस मुलाला जन्म; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
पिंकविलाने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, काजलने एका मुलाला जन्म दिला. मात्र, काजल आणि तिचा पती गौतम किचलू (Gautam Kitchlu) यांनी आई-वडील झाल्याची अधिकृत माहिती दिलेली नाही. पण चाहत्यांनी आतापासूनचं या जोडप्याचे अभिनंदन करायला सुरुवात केली आहे.
Kajal Aggarwal Blessed With Baby Boy: अजय देवगणसोबत 'सिंघम' चित्रपटात काम केलेली अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आई झाली आहे. ही आनंदाची बातमी ऐकून काजलच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. पिंकविलाने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, काजलने एका मुलाला जन्म दिला. मात्र, काजल आणि तिचा पती गौतम किचलू (Gautam Kitchlu) यांनी आई-वडील झाल्याची अधिकृत माहिती दिलेली नाही. पण चाहत्यांनी आतापासूनचं या जोडप्याचे अभिनंदन करायला सुरुवात केली आहे.
फेब्रुवारीमध्ये काजल अग्रवालचा बेबी शॉवर सोहळा पार पाडला. ज्याचे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले. या सोहळ्यात काजल गुलाबी रंगाच्या बनारसी साडीत खूपचं सुंदर दिसत होती. तिच्या पारंपारिक लूकची खूप चर्चा झाली. गरोदरपणात काजल स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा करायची आणि चाहत्यांना फिटनेस टिप्सही देत असे. (हेही वाचा - Jayeshbhai Jordaar Trailer Release: Ranveer Singh च्या 'जयेशभाई जोरदार' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; Watch Video)
काजल अग्रवालने 30 ऑक्टोबर 2020 रोजी एका खाजगी समारंभात गौतम किचलूशी लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाच्या फंक्शन्समध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. काजलचा नवरा गौतम हा फिल्म इंडस्ट्रीतील नसून एक बिझनेसमन आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला दोघांची मैत्री झाली आणि नंतर बघता बघता या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केले.
काजल अग्रवालने 2022 च्या सुरुवातीला एका पोस्टद्वारे चाहत्यांना तिच्या गरोदरपणाची माहिती दिली होती. गर्भधारणेच्या काळात ती खूप सक्रिय होती. तिने पती गौतम किचलूसोबत बेबी बंप फ्लॉट करताना फोटोशूट देखील केले होते. ज्याची खूप चर्चा झाली होती. आता चाहते काजल अग्रवाल आणि गौतम किचलूच्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)