Kabir Singh Official Trailer: वैद्यकिय शिक्षण, प्रेम-फसवणुक आणि नशेच्या धुंदीमधील शाहीद कपूरच्या कबीर सिंह चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित (Video)

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor)आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भुमकेतील कबीर सिंह चित्रपट येत्या 21 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kabir Singh (Photo Credits-Twitter)

Kabir Singh Official Trailer:बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor)आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या मुख्य भुमकेतील कबीर सिंह चित्रपट येत्या 21 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी आज (13 मे) 'कबीर सिंह' (Kabir Singh) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये शाहिद कपूरचा नशेच्या धुंदीमधील अंदाज आणि वैद्यकिय शिक्षण, प्रेमप्रकरण आणि फसवणुक यांचा मेळ असणारा लूक ट्रेलरमधून दिसून येत आहे.

शाहिद कपूर या चित्रपटातून एका वैद्यकिय विद्यार्थ्याची भुमिका साकारताना दिसून येणार आहे. मात्र प्रेमप्रकरणी यशस्वी न झाल्याचे सुद्धा दिसणार आहे. तर शाहिदने एका मुलाखती दरम्यान असे सांगितले होते की, नशेच्या अवतारासाठी दिवसाला 20 सिगरेट ओढायचा. मात्र घरी जाण्यापूर्वी दोन तास अंघोळ करायचा असे सुद्धा शाहिदने सांगितले आहे.(Kabir Singh Teaser: रागीट, दारुडा, डॉक्टर शाहीदचा नवा अंदाज; धीस इज मी म्हणत 'कबीर सिंह'चा टीजर प्रदर्शित Video)

तर अर्जुन रेड्डीचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनीच कबीर सिंहचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ‘कबीर सिंह’ हा दक्षिणेतील सुपरहिट चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक आहे. अर्जुन रेड्डीमध्ये विजय देवरकोंडा या अभिनेत्याने भूमिका साकारली होती आणि त्याचे बरेच कौतुकही झाले होते. मात्र कबीर सिंहचा ट्रेलर पाहून शाहिदही कुठेच कमी पडला नसल्याचे जाणवत आहे.