काळवीट शिकार प्रकरण: शस्त्र बाळगल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी सलमान खान याला जोधपूर कोर्टाकडून दिलासा
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान याला काळवीट शिकार प्रकरणात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी जोधपूर कोर्टाने दिलासा दिला आहे.
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान (Salman Khan) याला काळवीट शिकार प्रकरणात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी जोधपूर कोर्टाने दिलासा दिला आहे. 2006 मध्ये सलमान खानने एक खोटं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. ज्यात सलमान खान याने शस्त्र बाळगण्याचा परवाना हरवल्याचं म्हटलं होतं. मात्र आता या प्रकरणातही सलमान खानला निर्दोष ठरवण्यात आलं आहे. खोटं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्याचा सलमान खान याचा हेतू नसल्याचंही त्याच्या वकिलांनी म्हटलं आहे.
ANI ट्विट:
1998 मध्ये 'हम साथ साथ है' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान जोधपूर येथे काळवीटची शिकार आणि शस्त्र बाळगल्याने सलमान खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सलमान खान याला शस्त्र परवाना कोर्टात जमा करायचा होता. मात्र सलमान खानने हा परवाना हरवल्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले होते. त्यानंतर सलमान खान याचा शस्त्र परवाना हरवला नसून तो नुतनीकरणासाठी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे सलमान खान याने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने त्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी 2006 मध्ये करण्यात आली. आता या प्रकरणातही सलमान खान याला जोधपूर कोर्टाने दिलासा दिला आहे.