Sushant Singh Rajput Death Inquiry: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युच्या चौकशीच्या मागणीसाठी, जितेंद्र आव्हाड घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट

अजूनही त्याचे चाहते, सामान्य जनता या धक्यातून बाहेर येऊ शकली नाही. सुशांतच्या मृत्युनंतर अनेक कलाकारांनी बॉलीवूडमधील घराणेशाहीचे सत्य लोकांसमोर मांडले आहे. याच नेपोटिझम (Nepotism) मुळे आलेल्या डिप्रेशनमध्ये सुशांतने आत्महत्या केली असल्याचे नेटीझन्सचे म्हणणे आहे.

जितेंद्र आव्हाड आणि सुशांत सिंह राजपूत (संग्रहित संपादित प्रतिमा)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची आत्महत्या हा सर्वांसाठीच एक मोठा घाव आहे. अजूनही त्याचे चाहते, सामान्य जनता या धक्यातून बाहेर येऊ शकली नाही. सुशांतच्या मृत्युनंतर अनेक कलाकारांनी बॉलीवूडमधील घराणेशाहीचे सत्य लोकांसमोर मांडले आहे. याच नेपोटिझम (Nepotism) मुळे आलेल्या डिप्रेशनमध्ये सुशांतने आत्महत्या केली असल्याचे नेटीझन्सचे म्हणणे आहे. आता हा मुद्दा अजून गंभीर होत चालला असून, सुशांतच्या मृत्यूबाबत कसून चौकशी होण्याची शक्यता आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुढाकार घेतला आहे. जितेंद्र आव्हाड स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणार आहेत.

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये आव्हाड यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणतात, ‘मी वैयक्तिकरित्या गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांतच्या मृत्यूबाबत चौकशीची आणि सत्य समोर येण्याची मागणी करणार आहे. सुशांतचे चित्रपट थांबवले गेले का? त्याच्या चित्रपटांवर बंदी घातली का? त्याला काही चित्रपटांमधून जबरदस्तीने काढून टाकले गेले होते का? असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे मिळायला हवीत.’

पुढे ते म्हणतात, ‘मला वाटते की सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सविस्तर चौकशी झाली पाहिजे. आम्ही बॉलीवूडमध्ये जागा मिळवण्यासाठी पटनाहून आलेला आगामी प्रतिभावान अभिनेता गमावला आहे. जे घडले ते भयानक आहे व कोणतीही नवीन व्यक्ती यातून जाऊ नये.’ (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अनेक कलाकारांची बॉलीवूडवर सडकून टीका; समोर आले भयानक सत्य, जाणून घ्या कोण काय म्हणाले)

दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी समोर येऊन इथल्या भेदभावाबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. कंगना रनौत, रविना टंडन, श्वेता पंडित, प्रकाश राज असे अनेक कलाकार यात सामील आहेत. दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आईनेही एक व्हिडिओ पोस्ट करत सलमान खानने कसा आपल्या पॉवरचा, पैशांचा वापर करून गोष्टी दाबल्या याचे उदाहरण दिले आहे.