Jawan Advance Booking: शाहरुख खानच्या 'जवान'रिलीजआधीच मोडला 'पठाण'चा रेकॉर्ड

शाहरुख खानच्या जवान या सिनेमात शाहरुखसह नयनतारा आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच दीपिका पदुकोणचीही एक छोटी भूमिका या चित्रपटात असणार आहे.

Shahrukh Jawan Movie Clip Viral PC twitter

शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या 'जवान' (Jawan) या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनच्या कामात व्यस्त आहे. काही महिन्यापुर्वी आलेल्या किंग खानचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. शाहरुखच्या 'जवान' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे. शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता परदेशात या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.

यूएईमध्ये या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात होणार आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रिलीजआधीच या सिनेमाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'पठाण' या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. वेंकी रिव्यूज आणि सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'जवान' या सिनेमाच्या रिलीजच्या तीन आठवडे आधी या सिनेमाचे 4,800 तिकीटांची विक्री झाली आहे. 'पठाण' या सिनेमाने अमेरिकेत रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.85 मिलियन डॉलरची कमाई केली होती. तर आता 'जवान' हा सिनेमा 'पठाण' सिनेमापेक्षा जास्त कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

शाहरुख खानच्या जवान या सिनेमात शाहरुखसह नयनतारा आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच दीपिका पदुकोणचीही एक छोटी भूमिका या चित्रपटात असणार आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक एटली कुमार 'जवान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.  आता शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement